women’s protest 2020: कोंढव्यात गेल्या 5 दिवसांपासून महिलांचे 24 तास आंदोलन सुरू
women’s protest 2020 : सजग नागरिक टाइम्स :पुणे :- मोदी सरकारने लागू केलेले सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट , एन आर सी , एन पी आर विरोधात पुणे शहरात दोन मोठी महारॅली काढण्यात आली,
यात मुस्लिम महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता . सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट , एन आर सी , एन पी आर मुळे होणाऱ्या नुकसानीपासून देशाला वाचविण्यासाठी
या कायद्यात बदल व्हावा किंवा रद्द होण्यासाठी महिलाही मैदानात उतरले आहे. कोंढव्यात कुल जमाते तंजिम मार्फत गेल्या पाच दिवसांपासून महिला मंडळी 24 तास आंदोलने करत आहे.
या आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग आहे, यात 2 महिन्यांच्या बाळापासून ते 80 वर्षीय वृद्धापर्यंत महिला शामिल आहे.
पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला वर्गांनी सतत चोवीस तास आंदोलन करत बसणे ही पहिलीच घटना आहे .
या आंदोलनात स्टुडन्ट, गृहिणी , डॉक्टर , इंजिनियर , आलीमा ,एडवोकेट ,प्रोफेसर ,टीचर ,फॅशन डिझायनर ,
सोशल ऍक्टिव्हिटीज व वृद्ध महिला ,हॅंडीकॅप ,डायबेटीक पेशंटचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे.
सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट , एन आर सी , एन पी आर विरोधात विविध प्रकारे आंदोलन या महिला वर्गांनी चालविले आहे.
या आंदोलनात पोस्टर बनविणे , स्लोगन तयार करून ते बोलणे ,देशभक्तांची माहिती देणे ,देशाच्या उन्नतीसाठी प्रार्थना करणे ,
मानवी साखळी बनवून आंदोलन करणे , पोयम बनविणे ,घोषणाबाजी करणे ,घोषणा विद्यार्थ्यांना शिकविणे ,कँडल मार्च असे विविध प्रकारे आंदोलने करत आहे .
या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे ,लोकायत या संघटनेच्या अध्यक्षा अलका जैन यांनीहि पाठिंबा दिला असून त्यांच्या संघटनेचे विद्यार्थी या महिलांसोबत काम करत आहे
दोनच दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनीही कोंढव्यातील आंदोलनात येऊन आंदोलनाला पाठींबा दिला व काहीकाळ त्यांचे मनोगत व्यक्त करून घोषणा हि दिल्या,
जोपर्यंत सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट , एन आर सी , एन पी आर मध्ये बदल होत नाही किंवा ते रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे महिलांनी सांगितले.