ताज्या घडामोडीपुणे

मनपा आयुक्तांच्या आदेशास अधिकाऱ्यांकडून हरताळ..! थेट महापालिकेत वाढदिवस साजरा..

Advertisement

celebrate birthday in lockdown : लाॅकडाउनचया काळात सर्व सामान्यांवर होतीय कारवाई मग अधिकाऱ्यांवरही आयुक्त शेखर गायकवाड कारवाई करणार का?

Celebrate birthday in lockdown : सजग नागरिक टाइम्स : पुणे :- जगभर कोरोना विरुध्द विविध शासकीय संस्था विविध मार्गांनी लढा देत आहेत,

पण पुणे महानगरपालिका भवन कार्यालयात महापालिका अधिकारीच आदेश न पाळता केराची टोपली दाखवीत आहेत.

अश्या अधिकाऱ्यावर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड कारवाई करणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

जिल्हाधिकारी पुणे व पुणे महानगरपालिका यांनी कोरोनाबधिताची संख्या वाढू नये म्हणून सामाजिक अंतर ठेवणे व मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.

जे नागरिक या नियमांचे उल्लंघन करतील त्यांना ५०० ते १००० दंड ठोठावत आहेत. शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करू नये

ही शासकीय नियमावली असतांना सुद्धा कोरोनाच्या महामारीत महापालिका अधिकारी भवन कार्यालयात ऑन ड्युटी वाढदिवस साजरे करीत आहेत.

हे वाढदिवस वरिष्ठ अधिकारीच सर्व नियम धाब्यावर ठेऊन राजरोसपणे साजरे करीत आहेत. या विभागातील ठेकेदारांच्या मदतीने वाढदिवस होत आहेत.

महापालिका भवन कार्यालयात ठेकेदारांना ऑनलाईन काम करण्याचे आदेश कोरोना प्रादुर्भावामुळे देण्यात आले असताना मात्र वाढदिवस साजरा करण्यासाठी ठेकेदारांची वर्दळ सुरू आहे.

Advertisement

वाढदिवस साजरा करताना अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांनी कोणतेही सामाजिक अंतर पाळलेले नाहीत. किंबहुना तोंडाला मास्क सुद्धा लावलेले नाही.

नुकताच महापालिका भवन कार्यालयात विद्युत विभागातील मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांचा वाढदिवस वरिष्ठअधिकारी कटवते,

कनिष्ठ अभियंता यांच्या उपस्थितीत कोणतेही सामाजिक अंतर न राखता, तोंडाला मास्क न लावता साजरा करण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार वाढदिवसाचा केक विद्युत विभागाच्या एका मोठ्या ठेकेदाराने पुरविला होता.

महापालिका आयुक्तांचे आदेश धाब्यावर ठेऊन चक्क महापालिका भवनात आयुक्त महापालिकेत उपस्थित असतांना साजरा केला गेला.

महापालिका भवनातच अधिकारी कोरोना करीता आयुक्तांनी केलेल्या नियमांचे पालन करीत नसतील तर

सर्व सामान्य जनतेने सामाजिक अंतर राखणे व मास्क न लावणेबद्दल दंड व कारवाई करण्याचे अधिकार महापालिका प्रशासन का असावेत असा प्रश्न सामान्य जनता विचार आहे.

सामाजिक अंतर न पाळणे व मास्कचा वापर महापालिका भवनात न करनेबद्दल मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्यावर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड कारवाई करणार का? यावर नागरिकांचे लक्ष टिकून राहणार आहे.

Corona मुळे नागरिक कोमात तर Noble Hospital चा धंदा जोमात ?

Share Now

One thought on “मनपा आयुक्तांच्या आदेशास अधिकाऱ्यांकडून हरताळ..! थेट महापालिकेत वाढदिवस साजरा..

Comments are closed.