Rangoonwala Talent Search :विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला दिशा देणाऱ्या योजनेची द्वी-दशक पूर्ती उत्साहात
Rangoonwala Talent Search : सजग नागरिक टाइम्स : पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला टॅलेंट सर्च स्कीम या स्कॉलर बॅच च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ऑन लाईन करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार अध्यक्षस्थानी होते. अल्पसंख्य,गरीब,गुणी विद्यार्थ्यांना बारावी परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने ही स्कॉलर बॅच १९९९ मध्ये स्थापन करण्यात आली होती .
आता पर्यंत १५१६ विद्यार्थी वैद्यकीय,अभियांत्रिकी ,आय आय टी,डेंटल,आर्किटेक्चर अशा व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होवून आयुष्यात यशस्वी झाले आहेत.
नगरसेवक रफिक शेख यांच्या प्रयत्नातून काशेवाडी लोहियानगर मध्ये नागरिकांसाठी सैनिटायजर स्टँड
या तुकडीचा द्वी-दशक पूर्ती सोहळा सोहळा १८ जुलै २०२० रोजी ऑन लाईन पार पडला.
या बॅच साठी निवडीची प्रक्रिया,परीक्षा अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल मध्ये पार पडते आणि दैनंदिन तास आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले जातात.
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल च्या मुख्याध्यापक परवीन शेख,गफार सय्यद यांनी ही माहिती दिली.
या बॅच च्या विद्यार्थ्यांचे अकराविपासून प्रश्न मंजुषा,परीक्षा,चाचण्यांच्या माध्यमातून विशेष तयारी करून घेतली जाते .
बारावीच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
संगणक साक्षरता,इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्व विकसनाचे उपक्रम या तुकडीसाठी आयोजित केले जातात.