Sanitizer stand : नगरसेवक रफिक शेख यांच्या प्रयत्नातून काशेवाडी , लोहियानगर मध्ये नागरिकांसाठी सैनिटायजर स्टँड
Sanitizer stand: सजग नागरिक टाइम्स : पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे,
त्यामुळे प्रशासन लॉक डाऊन चा वेळ वाढवून त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करित आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर पुणे महानगर पालिकेतील प्रभाग क्र १९ चे नगरसेवक रफिक शेख यानी
प्रभाग क्र १९ मधिल काशेवाडी व लोहियानगर परिसरामध्ये नागरिकांनी आपले हाथ सेनेटायज करण्यासाठी सैनिटायजर स्टँड उभारले.
प्रभाग क्र १९ चे नगरसेवक रफिक शेख यानी केलेल्या कामाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे .
यापूर्वी हि शेख परिवाराने लॉक डाऊन च्या काळात अनेक गरजूंना रेशन कीट,रोख रक्कम देऊन मदत केली आहे. शेख परिवाराचे सामाजिक काम हे वर्षाच्या १२ महिने चालत असतात .
माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेखकडून पुणे मनपाला लाख रुपयांची मदत