News Updatesपुणे

आपत्कालीन विभाग झाले आउट ऑफ रिच:रूग्णांचे होताहेत हाल

Advertisement

Bunker Quarantine Center news :हडपसर : बनकर कॉरंटाइन सेंटर मधिल प्रकार

Bunker Quarantine Center news

Bunker Quarantine Center news : सजग नागरिक टाइम्स :हडपसर : काही दिवसा पुर्वीच स्थानिक आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते,

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कै.रामचंद्र आप्प‍ा बनकर एज्युकेशन व स्पोर्टस कॉम्पलेक्स येथे नागरिकांसाठी मोफत कोरोना स्वॅब सेंटर व क्वारंटाईन सेंटरचे उद्घाटन क रण्यात आले होते.

त्या सेटरमधिल गैरसोयीबाबत एका पेशंट ने विडियो बनवुन सोशल मिडीयावर वायरल केले.

Advertisement
विडियो पहा

आपत्कालीन वेळी आरोग्य प्रमुख व हडपसर मुढवा सहाय्यक आयुक्त यांचा फोन ब्लॅकलिस्टवर ठेवल्याने उपचारासाठी रुग्णाची धावाधाव होत आहे ,

रूग्नाना सोयीसुविधा मिळावे म्हणून नगरसेवक योगेश ससाणे गेली दोन दिवस प्रयत्न करताहेत,

पण आरोग्य यंत्रणा ठप्प असुन श्री हंकारे आरोग्य प्रमुख यांच्या कडे आरोग्य प्रमुख व हडपसर मुढवा सहाय्यक आयुक्तपद असुन त्यांची हकालपट्टीची ससाणे यांनी मागणी केली आहे.

यावेळी नगरसेवक मारूती आबा तुपे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

समाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ

Share Now