फ्रेंच अंतर्वस्त्रे आणि बीचवेअर ब्रॅन्ड ‘ऑबाद’ चे या कार्यक्रमात अनावरण
Pune,सातत्याने दोन मौसम यशस्वी केल्यानंतर आता India Intimate Fashion Week
या भारतातील एकमात्र अशा अंतर्वस्त्र आणि इंटिमेट वेअर साठी असलेल्या Fashion week तर्फे आता आपल्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला
असून ११ जुलै २०१९ रोजी त्यांनी पुणे येथील सर्वांत चांगल्या लक्झरी नाईट क्लब असलेल्या Cult House येथे “आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी- दि इंटिमेट फॅशन टूरचे” आयोजन केले होते.
आयआयएफडब्ल्यू तर्फे अभिमानाने प्रथमच फ्रेंच अंतर्वस्त्रांचा आणि बीचवेअर ब्रॅन्ड ‘ऑबाद’ चे अनावरण केले आहे.
ऑबाद ने आयआयएफडब्ल्यू आणि कँडी शॉप (इंडिया) बरोबर सहकार्य करून देशात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
कंपनी आता भारतात २५ आंतरराष्ट्रीय अंतर्वस्त्रांचे ब्रॅन्ड्स आणण्यात येणार आहेत.
याचबरोबर अंतर्वस्त्रांची विक्री आता ई कॉमर्स च्या माध्यमातूनही होणार आहे.
आयआयएफडब्ल्यू च्या तिसर्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत त्यांनी आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी- दि इंटिमेट Fashion tour मोठी आणि चांगली करण्याची संकल्पना पुढे आणली आहे.
( India Intimate Fashion Week) एनएक्सटी ही संकल्पना अनोखी असून यांत प्लस साईझ, नवीन फॅशन आणि वैयक्तिक स्वच्छतेचा दृष्टिकोन यांचा समावेश करण्यात आला आहे.
मोठा आकार निषिध्द मानल्या गेलेल्या समाजातही आता इंटिमेट फॅशन आणि वैयक्तिक स्वच्छतेला प्रधान्य देण्यात येत आहे.
ऑबादचे देश प्रमुख आणि सीईओ श्री ग्रेगरी गो हिल यांनी सांगितले “ अतिशय चांगल्या अशा भारतीय बाजारपेठेत आमची उत्पादने सुरू करतांना आंम्हाला खूपच आनंद होत आहे.
( India Intimate Fashion Week) आयआयएफडब्ल्यूच्या मंचावरून आणि चांगल्या टिम बरोबर काम करण्याची ही मोठी संधी आहे.
या अनावरणासाठी आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून संपर्कात होतो आणि आता उद्घाटनाची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
भारतीय बाजारपेठ ही वाढीसाठी खूपच अनुकूल आहे. भविष्यातील या बाजारपेठेचा एक भाग होण्याची संधी मिळणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो.”
ते पुढे म्हणाले “ दि ऑटम विंटर २०१९/८० ऑबाद कलेक्शन च्या माध्यमातून ऑबाद पुन्हा आर्ट नुव्हो फॉर २०१९/२० ऑटम विंटर सिझन मध्ये आगमन करत आहे.
ऑबाद हे शक्तीशाली महिलांचे प्रतीक आहे. त्या आत्मविश्वासाने युक्त आणि लक्ष्याचा वेध घेणार्या आहेत.
ऑबाद महिला या स्वतंत्रविचारांच्या आहेत व अतिशय मजबूत विचारांच्या म्हणजेच साराह बर्नहार्ट, माता हरी आणि इसाडोरा डंकन यांसारख्या ऐतिहासिक महिलांचे प्रतिनिधीत्व करतात.
या अधुनिक, मुक्त आणि आकर्षक महिला या ऑबाद च्या प्रतिबिंब आहेत. या महिलांसाठी ऑबाद तर्फे डेलिकेट लाँजरी सुरू केली असून यांत आराम आणि हवेशीरपणा बरोबरच एम्ब्रॉयडरीही आहे.
यांतील फुलांचे आणि निसर्गरम्य रंगांमुळे ऑबाद च्या ऑटम विंटर २०१९/२० कलेक्शन मध्ये आर्ट नुव्हो च्या कलाकृतीं मुळे आकर्षक असे सौंदर्य खुलून येते त्याच बरोबर मुक्तता आणि प्रेमाचा अनुभवही मिळतो.”
जयपूर येथील डिझायनर जोडी असलेल्या छल्ली आणि मल्याज यांनी यावेळी त्यांच्या ‘अभिसार’ अंतर्गत बीचवेअर ची श्रेणी प्रदर्शित केली,
यामध्ये संपूर्णत: भारतीय संस्कृतीचे घटक समाविष्ट करण्यात आले होते. या कलेक्शन मध्ये हाताने
विणलेले, बांधलेले, एम्ब्रॉयडरी, ॲप्लिक वर्क आणि अशा अन्य घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या कलेक्शन मधील रंगांत आकर्षक पिवळा आणि पीचेस सह मुव्हे, इंडिगो आणि सी ग्रीन सारख्या शेड्सचाही समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये त्यांनी अनोखे वस्त्र प्रकार जसे कॉटन सिल्क, कोटा-डोरिया आणि सिल्क यांचा वापर केला आहे.
तसेच रंग देण्याच्या तंत्रज्ञानामध्ये सॉलिड डाईज, टाय एन डाय, फोल्डिंग आणि क्लॅम्पिंग वर अधिक प्रमाणात भर देण्यात आला आहे.
आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी मध्ये नवोदित डिझायनर असलेल्या एनआयएफटी बंगलोर च्या असलेल्या सिमरन धोंड ला प्रथमच संधी देण्यात येत असून सिमनल ने आपल्या कलात्मकतेवर,
संशोधनावर खूप काम केले असून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
आपल्या कलेक्शन विषयी बोलतांना सिमरन म्हणते “ लहानपणापासूनच मला जगभरांतील देवतांच्या गोंष्टींतून निर्माण झालेल्या बुध्दी, सौंदर्य, साहस आणि उदारतेचे आकर्षण राहिले आहे.
या देवतांनी महिलांना जी प्रेरणा दिली ती खूपच सक्षम करणारी आहे. एक अनोखी ओढ, मातृत्वाची आस, निर्दोषत्व आणि उर्जा यांमुळे या देवता प्रत्येक महिलेसाठी आदर्श ठरल्या आहेत.
देवी श्रृंगार या संकल्पनेतून प्रत्येक महिलेला व्यक्तीपासून देवतेपर्यंतचा प्रवास करणे शक्य होते.
हे कलेक्शन प्रत्येक व्यक्तीला जोडते विशेषकरून अशा वेळी ज्यवेळी आपण देवीचा विचार करतो त्यावेळी आपल्याला शंख,त्रिशूल, कमळ, पदर आणि आभूषणे आपल्यासमोर येतात.
अतिशय सखोल पणे त्यांची आभा ही त्यांच्या मुर्तीं मधून, चित्रांमधून आणि अमरचित्रकथेच्या पुस्तकांतून आपल्याला पहायला मिळते.
यांतील आभूषणे ही विशेषकरून या कलेक्शन साठी तयार करण्यात आली आहेत.
काफी ॲमरस या इंटिमेट वेअर कलेक्शन मध्ये अंतर्वस्त्र आणि स्लीपवेअर चे प्रदर्शन
करण्यात येणार आहे.”
“एक जेन-नेक्स्ट डिझायन म्हणून आयआयएफडब्ल्यू एनएक्सटीचा एक भाग होतांना मला आनंद होत आहे.
ही खूप मोठी संधी आहे आणि मला हा सन्मान मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
एक इंटिमेट वेअर डिझायनर असल्याने मी इंडिया इंटिमेट फॅशन वीक वर गेल्या काही दिवसांपासून नजर ठेऊन होते आणि कोणत्याही प्रकारे या संस्थेचा भाग होण्यास उत्सुक होते.
मला जेन नेक्स्ट डिझायनरविषयी कळले आणि मी खूप उत्साहाने कामाला लागले व इंटिमेट वेअर क्षेत्राचा अभ्यास सुरू केला,
मला इंटिमेट वेअर क्षेत्रात अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे.मला आशा आहे की या मंचा मुळे मला अनोखा अनुभव तर मिळेलच पण त्याच बरोबर एक अविस्मरणीय प्रवास करण्याची संधी मिळेल.
”ती पुढे म्हणाली. ( India Intimate Fashion Week) तर्फे कल्ट हाऊस बरोबर सहकार्य करारही या निमित्ताने करण्यात आला आहे.
कल्ट हाऊस हा पुण्यातील एक हाय एन्ड लक्झरी नाईट क्लब्ज पैकी एक आहे. आयआयएफडब्ल्यू बरोबरच्या सहकार्या विषयी बोलतांना कल्ट हाऊस चे भागिदाररिषभ बवेजा यांनी सांगितले
“ या कार्यक्रमा करता मी खूपच उत्साही आहे आणि मला खात्री आहे की कल्ट सारख्या स्थाना मुळे हा शो अधिक ग्लॅमरस आणि आकर्षक होऊ शकेल. आयआयएफडब्ल्यू बरोबरचा हा कार्यक्रम अतिशय चांगला होईल अशी मी आशा व्यक्त करतो.