ताज्या घडामोडीपुणे

सिलेंडर दरवाढ विरोधात उपहासात्मक श्रद्धांजली वाहुन आंदोलन.

Advertisement

सजग नागरिक टाइम्स :

पुणे शहर काँग्रेस पक्षातर्फे पूना कॉलेज समोर मा.नगरसेवक रफिक शेख व संगीता तिवारी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने लोहियानगर , काशेवाडी येथे उपहासात्मक” गॅस सिलेंडर ला श्रद्धांजली वाहीली, आणि लाकडाच्या मोळी ची पूजा ” करण्यात आली.

मोदी सरकार ने पुन्हा ५० रुपयाने गॅसची दरवाढ केली आहे. गॅस चे दर १००० पर्यंत गेले आहे, ह्या दरवाढीच्या विरोधात पुणे शहर काँग्रेस पक्षा तर्फे आंदोलन करण्यात आले.

” घराला सरपण देणारी पार्टी ” ह्या भाजपा आणि मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे असे म्हणत सिलेंडर ला हार घालून त्यास भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि लाकडाच्या मोळी ची पूजा करण्यात आली.

आम्हाला गॅस तर परवडणार नाही.त्यामुळे सरपणच आणावे लागणार आहे. ” मोदी सरकार मस्त है … गरीब जनता महंगाई से त्रस्त है ” अश्या अनेक घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या.

Advertisement

क्या से क्या कर दिया बेवफा भाजपा पार्टी ने.ह्या ढोंगी नी मते मागितली विकास.रोजगार,आणि प्रगती च्या नावावर आणि दिले काय तर गरीब जनते च्या झोळी मध्ये बेरोजगारी आणि प्रचंड महागाई ,विकास तर जनमलाच नाही. गरीब जनते ला शिक्षण महाग करून ठेवले आहे आता गरीब पोट कसे भरणार एवढा महाग गॅस घेवून. छोटे छोटे व्यावसायिक आता कोरोना मधून त्यांची कंबर तुटली आहे आणि त्यात सरकार गॅस, पेट्रोल डिझेल रोज महाग केले आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून रस्त्यावर उतरून हे आंदोलन घेण्यात आले.

आज हे गाणे आपल्याला आठवत असेल .” सखी सय्यां तो खूब ही कमावत है. महांगाई डायान खाये जात है “अश्या अनेक घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या.

ह्या आंदोलनात मां.नगरसेवक रफिक शेख, संगीता तिवारी. साबीर शेख. चंद्रकांत चौहान ,रफिक भाई कॉलनी,

विपुल उमंगे, विरू घोसरे , मनीष सोलंकी, मनीष तांद्रे ,नितीन म्हेत्रे ,गीत सत्यजीत म्हेत्रे , नासीर भाई , अब्दुल भाई, राजू भाई ,बेबी ताई ,राउत, सुनीता नेमुर्, सुशील साळुंखे, मिथीलेश करोसिया व प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Share Now