ताज्या घडामोडीपुणे

रेशन धान्याची चौकशी करण्यासाठी ११ पथकांची नियुक्ती,

Advertisement

(Investigate ration grains ) विभागीय पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश.

(Investigate ration grains ) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : अजहर खान

Appointment of 11 teams to investigate ration grains,
संग्रहित

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि रेशन दुकानदारांची चौकशी करण्यासाठी

पुण्यातील ११ परिमंडळांमध्ये ११ पथके स्थापन करण्याचा आदेश सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी सुनंदा भोसले -पाटील यांनी काढला आहे.

अन्नधान्य न मिळालेल्या शिधा पत्रिका धारकांच्या परिमंडळ निहाय आलेल्या तक्रारींची चौकशी ही पथके करणार आहेत.

रास्त धान्य दुकानांमध्ये अनियमितता आढळल्यास पंचनामे केले जाणार आहेत.

वाचा : रेशन धान्य मिळत नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो महिलांचा मोर्चा.

शासकीय कर्मचारी अथवा दुकानदार दोषी आढळल्यास कारवाई करून २ आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा ,असे या  आदेशात म्हटले आहे. 

लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे , पुणे शहर जिल्हा  प्रवक्त के.सी.पवार ,

अंकल सोनवणे यांनी या आदेशाचे स्वागत केले आहे. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे शहर व पुणे जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी ,

शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी , सर्व रेशनिंग दुकानदार यांची न्यायालयीन समिती नेमुन चौकशी करून दोषी वर  कारवाई करण्यात यावी,

अशी मागणी करीत लोकजनशक्ती पार्टीने  पुणे  विभागीय आयुक्त कार्यालयावर ३ नोव्हेंबर रोजी हजारो महिलांचा  संघर्ष मोर्चा काढला होता.

Advertisement

वाचा : पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयात नागरिकांची होतेय अडवणूक,

‘पुणे शहर व पुणे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी व सर्व परीमंडळ अधिकारी यांनी केंद्रसरकारचे संकेत डावलून मोफत धान्य वितरणाचे सेंटर उभे न करता

हे काम रेशनिंग दुकानदारावर सोपवून  भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सी.बी.आय मार्फत चौकशी करण्यात यावी.

सर्व रंगाच्या पांढऱ्या पिवळया व केशरी शिघापत्रिकेवर असलेली उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी.

व त्यांना विकत अथवा मोफत कायमस्वरुपी अन्नधान्याचा कोटा मंजूर करण्यात यावा व त्याचे वाटप करण्यात यावे.

रेशनिंग दुकानदाराने आपल्या विभागातील शिधापत्रिका धारकाची आधार कार्ड ची जोडणी स्वता करुन द्यावी व थंब ( अंगठा )जरी आधार कार्डला जोडला गेला नाही तरी शिधापत्रिकेला प्रमाण माणून त्यास धान्य देण्यात यावे.’

पुणे शहर व पुणे जिल्हयातील सर्व दुकानदारांनी मोफत आलेल्या अन्नधान्याचा साठा ज्या शिधापत्रिके धारकांना व आधार कार्ड असणाऱ्या  मजुरांना

व ज्यांच्याकडे शिधापत्रिका व आधार कार्ड नाही त्यांचा मोबाईल नंबरवर व मोबाईल नसेल तर त्याच्या फोटोवर जे धान्य वाटप केलेले आहे.

वाचा : किरकोळ कारणावरून सय्यदनगर मध्ये युवकाला जबर मारहाण

त्याची यादी जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे  करण्यात आली.

पुणे शहरातील ज्या गोरगरिब नागरिकांना ज्यांची शिधापत्रिका असताना सुद्धा व त्यांना परिस्थिती माहित असताना धान्य वितरण केले नाही,

त्या सर्व दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावे. व त्याच बरोबर संबंधित सर्व परिमंडळ अधिकारी व सर्व रेशनिंग इनिस्पेक्टर ,

तालुका पुरवठा अधिकारी , जिल्हा पुरवठा अधिकारी व शहर पुरवठा अधिकारी यांच्या वर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.

तक्रारदारासह पुरवठा विभाग उपायुक्त डॉ त्रिगुण कुलकर्णी यांना ३ नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आले.

Share Now