मोफत होणाऱ्या दफनविधीला पुणे मनपा मोजणार २८ लाख रुपये

Pune Municipal Corporation : मनपाच्या या खाबुगिरी विरोधात लोकहित फाउंडेशन पुणे तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Municipal Corporation : सजग नागरिक टाइम्स : पुणेकरांना पुणे महानगर पालिका काही ना काही कारणाने पैश्यांची उधळपट्टी करत असल्याचे पाहण्यास मिळत असते.

कोरोनाच्या काळात पुण्यातील काही सामाजिक संघटनांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या दफनाविधीसाठी एक रुपया ही न घेता मोफत दफनविधी केली,

पुणे महानगर पालिका त्यांचे त्यांचे सत्कार व त्यांना मानधन देण्याचे सोडून खाबूगिरी करण्यासाठी पुणे महानगर पालिकेने थेट २८ लाख रुपयांची टेडंर प्रक्रिया राबवली आहे.

Advertisement
video पहा

काहीही गरज नसताना ठेकेदाराच्या घश्यात २८ लाख रुपये घालण्यात येणार आहे.या संदर्भात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

निविदा तातडीने रद्द करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.

उममत सोशल फाउंडेशन व ख्रिश्चन संस्था महासंघ ह्या संस्थाना रितीरिवाजा प्रमाणे दफनविधी करण्याचे काम देण्यात आले होते.

Advertisement

विषेश म्हणजे गेल्या ६ महिन्यांपासून एक रुपयाही न घेता काम सुरू होते.

मोफत होणाऱ्या कामाला आता पालिका पैसे मोजणार असल्याने पुण्यातील सामाजिक संस्था रस्त्यावर उतरणार आहे.

या संदर्भात शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल,

Advertisement

जावेद शेख , शब्बीर शेख यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन निवीदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

तर लोकहित फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वाइन शॉप फोडून दारूचे बॉक्स पळविणारी टोळी गजाआड

Advertisement
Support our journalism - Support Sajag Nagrikk Times