Childrens Day : बालदिवसा निमित्त मुलांना खाऊ वाटप
Childrens Day ,सजग नागरिक टाइम्स : 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरु (भारताचे पहिले पंतप्रधान) यांचा जन्मदिवस,
या दिवसालाच बाालदिवस (childrens day) असे म्हणतात.व हा दिवस बालदिवस म्हणून साजरा केला जातो
आजच्या दिवशी काॅंग्रेस विचारधारा नुसार लहान चिमुकल्या समावेत त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे,
त्यांच्या सोबत हसत खेळत खाऊ वाटप करुन पंडितजीच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कॉग्रेस कार्यकत्यार्नी अभिवादन केले.
या वेळी हडपसर विधानसभेचे शोहेब इनामदार,प्रभाग अध्यक्ष नुरभाई शेख, महिला सर चिटणीस रजिया बल्लारी,
काँग्रेस सेवादलचे समिर मुल्ला ,संभाजी ब्रिगेड महिला अध्यक्ष सुरेखा जिजकर,
बामसेफचे विजय मोरे, अमिन दार, सद्दाम शेख,उपस्थित होते.
व सर्व चिमुकल्याना नुरभाई शेख यांनी खाऊ वाटप केल्याचे असलम इसाक बागवान यांंनी सांंगितले,
कोंढवा परिसरात असलम बागवान ,सलिम मुल्ला व त्यांच्या मित्रांनी मिळून एक फुड बंॅक चालू केली आहे,
या फुड बंॅकेच्या माध्यमातून लहान मुलांना मोफत जेवन देण्यात येत आहे.