wine shop:चोरांकडून ९५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
wine shop : सजग नागरिक टाइम्स : वानवडी मधील कलाल वाइन्स शॉपचे शटर उचकटून दारूचे बॉक्स चोरी करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाकडून अटक.
मोहसीन करीम सय्यद (वय ३१,रा.सय्यद नगर),असिफ उर्फ काल्या आयुब शेख (वय २८ रा.म्हाडा कॉलनी, हडपसर),
साहिल मेहबुब शेख ( वय १९, रा.म्हाडा कॉलनी, हडपसर) आणि हासिन इस्माइल मुल्ला (वय ३१, रा काळेपडळ हडपसर),
अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटरसायकली, दोन मोबाइल, साडेपाच हजारांची रोकड, शटर तोडण्याचे साहित्य,
२२ हजार रुपये किंमतीचे तीन दारूचे बॉक्स असा ९५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.