Homeताज्या घडामोडीगणेश मंडळांसाठी मोठी आनंदाची बातमी!

गणेश मंडळांसाठी मोठी आनंदाची बातमी!

Sajag Nagrik Times: पुणे : राज्य सरकार यावर्षीच्या गणपती उत्सवादरम्यान पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील गणपती मंडळांना रात्री १० वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची दिलेली शिथिलता कायम ठेवणार आहे.

पुण्यात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असल्याने येथील गणपती मंडळेही या निर्णयामुळे खूश आहेत,कारण १० दिवसांच्या उत्सवात पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर आता वाजवता येणार.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, शहरात लाऊडस्पीकर हे २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर या दिवशी १२ वाजेपर्यंत सूरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अध्यक्षा नीलम गोर्‍हे यांनी १९ ऑगस्ट रोजी गणपती मंडळांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शहरातील गणपती मंडळांच्या सूचना किंवा शिफारशींची सकारात्मक दखल घेण्याचे प्रशासनाला सांगितले.

Share Now
RELATED ARTICLES

2 COMMENTS

Comments are closed.

Most Popular

Recent Comments