Homeताज्या घडामोडीपुण्यामध्ये लॉकडाऊनची गरज नाही : महापौर, मुरलीधर मोहोळ

पुण्यामध्ये लॉकडाऊनची गरज नाही : महापौर, मुरलीधर मोहोळ

(lockdown in Pune) पुणे :

(lockdown in pune) पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात  कोरोनाबाधित रुग्णांची जुनी संख्या सादर करण्यात आली असावी.आता पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात नाही.

म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम  निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ  यांनी शुक्रवारी दिली.

पुण्यात आणखी कडक लॉकडाउन लावण्याची आवश्यकता नाही, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पुणे शहरात १८ एप्रिल, २०२१ रोजी अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ०३६ इतकी होती, जी ६ मे पर्यंत ३९ हजार ५८२ पर्यंत खाली आली आहे.

याचाच अर्थ अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्येत तब्बल १७ हजार ०५४ इतकी घट झाली आहे’, असेही महापौर म्हणाले.

पुणे शहरात कडक लॉकडाउन लावण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही भूमिका मांडली आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची उच्च न्यायालयात जी आकडेवारी सादर करण्यात आली आहे. ती सध्याची असू शकत नाही.

कारण गेल्या दोन आठवड्यात पुण्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्य सरकारकडून सध्या आकडेवारीत घोळ सुरू आहे.

त्यांच्याकडून जी आकडे जाहीर केली जात आहे. यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे.

मात्र मागील पंधरा दिवसात पुणे शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास मिळत असून सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास १६ हजारांनी कमी झाली आहे.

तर मृत्यूदर देखील तुलनेने खाली आला आहे, असे ही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुणे शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने, अनेक उपाययोजना केल्या जात आहे.

मात्र, त्याच दरम्यान पुण्यात १ लाख आणि मुंबईत ५३ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या असल्याचे समोर आले आहे.

ही आकडेवारी जिल्ह्याची असेल, असे मला वाटत आहे. पुणे शहरात जवळपास ३९ हजार करोना सक्रिय रुग्ण आहे.

हीच संख्या १५ दिवसांपूर्वी ५५ हजारांच्या पुढे होती. ही संख्या निर्बध आणि उपाययोजना यामुळेच आटोक्यात आली आहे.

तर शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण अशी मिळून लाखभर संख्या दाखविण्यात आली असावी, असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

“पुणे शहराची परिस्थिती नियंत्रणात असून आता सर्व माहिती घेऊन मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.

आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू. सध्या शहरात अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यामुळे आणखी लॉकडाउन लावण्याची आवश्यकता नाही.”

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular