ताज्या घडामोडीपुणे

अॅमनोरा पार्क हडपसर परीसरात चालत होता तीन पत्तीचा खेळ ,सासूला माहीती होताच धरून आणले पोलीस ठाण्यात

Advertisement

सासू कारवाई करतेय पण हडपसर पोलीस काढताहेत झोपा? सर्व कमाल दिसतोय वसुलीवाल्याचा?

Sajag Nagrik Times:pune : अॅमनोरा पार्क, हडपसर परीसरात काही जण बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी छापा टाकला असता काही जण बेकायदेशीरपणे पैसे लावुन तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे तसेच हुक्क्याचे सेवन करत असल्याचे मिळुन आल्याने १० जणांवर कारवाई करून रोख ४१ हजार ६२० व १४ हजार हुक्कयाचे फ्लेवर व साहित्य तसेच ५ लाख २३ हजार किंमतीचे मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ५ लाख ७८ हजार ७२०रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले १० जणांन विरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुरनं १२९१/२०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम ४ ( अ ) ५ व सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ ( अ ) २१ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाईसाठी हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भरत जाधव तसेच अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमय रसाळ,किशोर भुजबळ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे‌ या पथकाने केली आहे.

Share Now