पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयात नागरिकांची होतेय अडवणूक,

(Rationing Offices in Pune) पिवळे दुबार रेशनकार्ड देण्यास मनमानी कारभार, नवनवीन शक्कल लढवून नागरिकांची केली जातेय पिळवणूक.

सजग प्रतिनिधीने माहिती घेतली असता दुबारकार्डसाठी अर्जच येत नसल्याचा परिमंडळ अधिकाऱ्यांचा कांगवा.

(Rationing Offices in Pune) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : अजहर खान,

citizens-are-obstructed-in-the-rationing-offices-in-pune
file photo

पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयांतून काही ना काही कारणाने पिळवणूक होत असल्याचे सजग नागरिक टाईम्सच्या निदर्शनास आले आहे.

नागरिकांनी घेऊन गेलेल्या रेशनकार्डची कामे अधिकारी व कर्मचारी न करता मनमर्जी प्रमाणे काम करुन व काहीही नियम लावून नागरिकांना रेशनकार्ड देण्यास काही रेशनिंग कार्यालय चालढकल करीत आहेत.

Advertisement

पिवळे रेशनकार्ड दुबार ( फाटलेले,खराब झालेले,हरवलेले) देण्याचा शासनाचा आदेश असला तरी आम्ही बनविलेले नियम नागरिकांना स्विकार करावा लागेल या भूमिकेतून स्वताचे निर्णय नागरिकांवर लादण्याचा प्रकार काही परिमंडळ अधिकारी करत आहेत.

citizens-are-obstructed-in-the-rationing-offices-in-pune

काही परिमंडळ अधिकाऱ्यांना दुबार पिवळी शिधापत्रिका का देत नाही असे प्रश्न विचारले असता नागरिकांकडे आता तेवढं उत्पन्न आहे का?

आता नागरिक त्या उत्पन्न गटात बसत नाही?

असे म्हणून पिवळे रेशनकार्ड दुबार देण्यास चालढकल करीत आहे.

Advertisement

तर एकीकडे अन्नधान्य वितरण कार्यालयाने दिलेल्या माहिती अधिकारातील उत्तरात नमूद केले आहे की पिवळे रेशनकार्ड देण्यास बंद केलेले नसून पिवळे रेशनकार्ड दुबार देऊ नये असा कोणताही शासन निर्णय या कार्यालयाकडे उपलब्ध नाही.

मग जे परिमंडळ अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून पिवळे दुबार रेशनकार्ड देण्यास टाळाटाळ करीत आहे.

वाचा : पुणे शहरातून बदल्या झालेल्या ३ पोलीस निरिक्षकांना मॅटने दिला दिलासा,

तर शासन निर्णय महत्त्वाचा आहे का मनमर्जीपणा ? अ”ज”ग” ड” परिमंडळ अधिकारी पिवळे दुबार रेशनकार्ड देउ शकतात तर बाकिच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना नेमक त्रास काय?

Advertisement

असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

माहिती अधिकारात माहिती घेतली असता काही परिमंडळ अधिकाऱ्यांनी अंगलट येऊ न देता पिवळे रेशनकार्ड दुबारसाठी नागरिकांनी अर्ज जमा केले नसल्याचा कांगावा केला आहे.

परंतु अर्ज स्विकारले जात नसल्याने ते देणार कुठून?

Advertisement

अत्यावश्यक सेवा मध्ये मोडणारे रेशनिंग कार्यालय आता अत्यावश्यक सेवा पुरविण्यास कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

पिवळी दुबार शिधापत्रिका देण्याचे निकष- नियम असताना ते नियम धाब्यावर बसविण्याचा काम परिमंडळ अधिकारी करत आहे,

संबंधित अधिकाऱ्यांवर शासकीय कामकाज पार पाडताना हलगर्जीपणा केल्या प्रकरणी कारवाई करण्याची अंत्यंत गरज असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणटले आहे.

Advertisement

वाचा : अर्णब गोस्वामीला पोलीसांनी केले अटक

पुणे अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

१ जानेवारी २०१८ ते आजतागायत वितरीत करण्यात आलेल्या पिवळे रेशनकार्ड परिमंडळ निहाय माहिती अधिकारातील माहिती

Advertisement

“अ”. ४० “ज”.१४५ “ग”. २२२, “ड”.२६ “फ”.अर्ज प्राप्त नाही. “क”. वेबसाईट पहावी. “ल”. वेबसाईट पहावी. “ह”.दोन. “म” एक. “ई”.माहिती देण्यास टाळाटाळ. ” ब”.माहिती देण्यास टाळाटाळ.

रेशनिंग कार्यालया संदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्यास अन्नधान्य वितरण कार्यालय किंवा सजग नागरिक टाईम्सच्या प्रतिनिधींशी संपर्क ९८८१४३३८८३ साधावा.

Advertisement

One thought on “पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयात नागरिकांची होतेय अडवणूक,

Comments are closed.