(arnab goswami arrested) अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला पोलीसांकडून अटक
(arnab goswami arrested ) सजग नागरिक टाइम्स :
अर्णब गोस्वामीला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, याबाबत मुंबई पोलिसांनी अधिकृतपणे खुलासा केलेला आहे.
डिझायनर अन्वय नाईक आणि त्याची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी कारवाई केली आहे. आयपीसीच्या कलम 3०6 अन्वये अर्णबला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मे 2018 मध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक नेटवर्कच्या स्टुडिओच्या अंतर्गत डिझाइननंतर अर्णब गोस्वामी यांनी पैसे दिले नाहीत असा आरोप केला होता.
वृत्तसंस्था एएनआय च्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांनी घरात घुसून त्याच्याबरोबर हाणामारी केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.
रिपब्लिक टीव्ही वाहिनीने व्हिडिओ क्लिप्स शेयर केल्या आहेत, ज्यात पोलिस गोस्वामीच्या घरात घुसताना दिसत आहेत आणि संघर्षही सुरू आहे.
वाचा : मोहंम्मद पैगंबर यांच्या जयंती निम्मित रक्तदान शिबिराचे आयोजन
आर्थिक फसवणूक करुन मराठी व्यावसायिक अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे .
अर्णब ला अटक करताना अर्णब गोस्वामीच्या पत्नीने अटक वॉरंट फाडल्याची माहिती समोर आली आहे .
अर्णब ला अटक करताना चा एक विडीओ शेफाली वैद्य यांनी ट्वीट केले आहे.
अर्णब ला अटक केल्यानंतर अनेकांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
वाचा : हडपसर पोलीस स्टेशनला दबंग अधिकारी बाळकृष्ण कदम यांचे आगमन