Homeताज्या घडामोडीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षासहित इतरांवर गुन्हे दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षासहित इतरांवर गुन्हे दाखल

नगरसेवक प्रशांत जगताप , प्रदीप देशमुख , महेश हांडे , नगरसेविका दीपाली धुमाळ , नगरसेविका मृणाली वाणींसहित २५-३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल .

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी , महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी न घेता २८ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते .

याप्रकरणी काल मंगळवारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रदीप देशमुख , महेश हांडे , दीपाली धुमाळ , मृणाली वाणी , सुषमा सातपुते ,

किशोर कांबळे , विक्रम जाधव , बाळासाहेब बोडके , योगेश ससाणे , सुनिल बनकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० महिला ,

पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही प्रकारची पोलीस विभागाची व इतर विभागाची पूर्व परवानगी न घेता पुणे मनपा कार्यालयात त्यांना आत जाण्यास रोखले असताना त्यांनी न ऐकता बेकायदेशीर मंडळी जमविली .

मनपाचे जुन्या इमारतीच्या पायऱ्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करुन आंदोलन केले होते .

पोलीस शिपाई ज्ञानेश माने यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular