पी. एम .मोदींच्या पुणे दौऱ्याअगोदर पुण्यात लागले ‘मोदी गो बॅक’ चे बॅनर.

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुण्यातील मेट्रो आणि इतर विकास कामाचे उदघाटन करणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या दौऱ्याला पुण्यात जोरदार विरोध होत आहे.

पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भवानी पेठ व डेक्कन परिसरामध्ये ‘गो बॅक मोदी” या आशयाचे होर्डिंग लावले आहेत. कोरोना हा काँग्रेस मुळे पसरला असे नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले होते. त्यामुळे पुणे शहरात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गो बॅक मोदी’ असे बॅनर लावले आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कोरोना पसरवला असे वक्तव्य केले होते . काँग्रेसने आंदोलन सुद्धा केले होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शहरात ‘गो बॅक मोदी’ असे बॅनर लावले आहेत.

Advertisement
Advertisement
Spread the love