ताज्या घडामोडी

एका मालदार गून्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी वानवडी पोलीसांनी शाळा तोडण्याचे केले पत्रव्यवहार

Advertisement

एका मालदार गून्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी wanwadi police नी शाळा तोडण्याचे केले पत्रव्यवहार.

suspension-proceedings-for-3-people-including-api-shete-of-wanwadi-police-station/

हडपसर सय्यदनगर मधील शाळा पाडण्याचे पुणे महापालिकेला वानवडी पोलीस ठाण्याचे अजब पत्रव्यवहार?

I HELP YOU फक्त वतनदारा पुरतेच ,वानवडी पोलीसांबाबतीत संशयाची सुई?

एमआरटीपी अॅक्ट कायद्या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी अनभिज्ञ,

वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या अखत्यारीत येणार्या कोंढवा पोलीसात एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल परंतु वानवडी पोलीसात दाखल करायला बघायची भुमिका का?

सनाटा प्रतिनिधी(:पुणे शहर पोलीस smart होत असल्याचा फक्त डंका पिटला जात आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात कितीही सुशोभिकरण केले तरी पुणे पोलीसांचे जो पर्यंत विचार, क्षमता बदलत नाही तो पर्यंत पोलीसांवरील विश्र्वास घट्ट होणार नाही,

आज पुण्यातील सर्व पोलीस ठाण्यात I Help you चे बोर्ड मोठ्या अक्षरात लावले असले तरी काहि पोलीस ठाण्यातील बोर्ड फक्त नावापुरतेच किंवा आपल्या फायदया पुरतेच लावल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे ,

असाच एक प्रकार सरासर वानवडी पोलीसांकडून घडत आहेत हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शांळाने केलेले अनधिकृत बांधकाम संदर्भात पुणेमहानगरपालिकेतील बांधकाम विकास विभागाने पुणे वानवडी पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर 2018 रोजी तक्रार केली होती व त्याचा पाठपुरावा करण्यासाठी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता भूषन सोनवणे यांची नेमणूक केली होती.

सोनवणे हे गेल्या चार ते पाच महिन्यापासून वानवडी पोलीस ठाण्याला हेलपाटे मारत आहेत परंतु (Wanwadi police) वानवडी पोलीस ठाणे ते महमंदवाडी पोलीस चौकी असे चकरावरचकरा मारायला सोनवणे यांना भाग पाडले जात आहे.

कधी राईटर च जागेवर नाही तर कधी अधिकारीच जागेवर नाही ,तर कधी अधिकारी सुट्टिवर तर कधी राइटर सुट्टीवर अशा खेळ रंगलाय,वरीष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी ए.पी.आय कांबळे ना अनेकवेळा तोंडी आदेश देऊनही कनिष्ट काही ऐकन्याच्या मनस्थितीत नाही वरिष्ठांनचा कनिष्टांना काही धाकच उरलेला नाही.

Advertisement

या संदर्भात सनाटा प्रतिनिधी ने वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील व वानवडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील भोसले यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली परंतु त्यांच्याकडून फक्त आश्वासने पलीकडे काहीच झालेले नाही ,

यात ट्रस्टच्या संचालकाला वाचविण्याचा प्रयत्न होताना सुस्पष्ट दिसत आहे? सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांना टोलवाटोलवी करून गुन्हा दाखल करायला तब्बल चार महिने लावत असतील तर सामान्याचे काय?

सोनवणे यांनी डिसेंबर महिन्यात तक्रार केल्यावर सनाटा प्रतिनिधीने वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली असता सदरील तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचे हि लेखी पत्राद्वारे कळविले होते परंतु काहीही कारवाई न करता शाळा निशकाशित करा असे लेखि पत्र देऊन तक्रारीस निकाली काढण्यात आले असल्याचे सोनावणेंनी सांगितले.

तसेच एका समाजिक कार्यकर्ताने rti मध्ये माहिती घेतली असता कोंढवा पोलीस ठाण्यात एमआरटीपी अॅक्ट कलम 52 नुसार 2 गुन्हे दाखल असल्याचे rti च्या उत्तरात म्हणटले आहे

तसेच फिल्म अॅक्टर कपिल शर्मा याच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई न करता थेट एमआरटीपी अॅकट नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता ,

मग वानवडी पोलीस इनामदाराला का पाठिशी घालत आहे? हे न सुटणारे कोडे आहे, विषेश म्हणजे महमंदवाडी पोलीस चौकीतील पोलीसांनी तर शाळा निष्काशीत करून टाकण्याचे पत्र महानगरपालिकेला देऊन अकलेचे तारे तोडले आहे,

याचाच अर्थ महमंदवाडी पोलीस चौकीतील पोलीस ए.पी.आय.कांबळे यांची शाळा तुटावी व शाळेतील विद्यार्थी यांचे भवितव्य अंधारात जावे अशी इच्छा असल्याचे दिसते?

म्हणूनच एमआरटीपी अॅक्ट कायदा धाब्यावर बसवून थेट शाळा निष्काशीत करण्याचे पत्र दिले आहे. या विषयावर स्वता पोलीस आयुक्त के व्यंकटेशम दखल घेणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Share Now

One thought on “एका मालदार गून्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी वानवडी पोलीसांनी शाळा तोडण्याचे केले पत्रव्यवहार

Leave a Reply