शाळाचे अनधिकृतपणे बांधकाम केल्या प्रकरणी आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे शफि इनामदार विरोधात गुन्हा दाखल,(filed a complaint)
सजग नागरिक टाईम्स :पाठपुरावा 🙁filed a complaint ) पुणे हडपसर सय्यदनगरमधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या ट्रस्टीने
अनधिकृत बांधकाम करून शाळां चालू केली ज्यात विध्यार्थींच्या सुरक्षिततेचा विचारच केलेला दिसत नाही ,
सदरील ठिकाणी दोन इमारतींना जोडून एकच इमारत करण्यात आली व दोन्ही इमारतींना एकच जिना तो ही कमी रुंदीचा ,
सदरील शाळेत फायर ब्रिगेडची पण noc नाही ,शाळेच्या गॅलरी लोखंडि ग्रील लावून पूर्णपणे बंद केलेले ,
शाळेत एखादी दुर्घटना घडली अथवा आग लागली तर हज़ारो विध्यार्थी एकाच जिन्यावरून कसे काय बाहेर निघतील अश्यावेळी किती निष्पापप विध्यार्थांचा जीव जाईल ?
मध्यंतरी सुरतमध्ये एका इमारतीला आग लागली होती तसेच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेकांनी चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या होत्या यावेळी अनेक विद्यार्थींना जीव गमवावा लागला होता ,
सदरील शाळेत तर उड्या मारण्यासारखेही नाही किती मोठी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते ,
पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभागाने शाळेसोबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही शाळा प्रशासनाने दाद न दिल्याने
अखेर पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विकास विभागाला वानवडी पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर 2018 रोजी तक्रार करावी लागली व
त्याचा पाठपुरावा करण्यासाठी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता भूषन सोनवणे यांची नेमणूक केली होती.
हेपण वाचा : एका मालदार गून्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी वानवडी पोलीसांनी शाळा तोडण्याचे केले पत्रव्यवहार
सोनवणे हे गेल्या चार ते पाच महिन्यापासून वानवडी पोलीस ठाण्याला हेलपाटे मारत होते परंतु (Wanwadi police)
वानवडी पोलीस ठाणे ते महमंदवाडी पोलीस चौकी असे चकरावरचकरा मारायला सोनवणे यांना भाग पाडले जात होते.
याची बातमी सजग नागरिक टाईम्स ने प्रसिद्ध करताच वरिष्ठांनी बातमीची दखल घेत वानवडी पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते,
शाळेचे अनधिकृतपणे बांधकाम केल्या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 नुसार
शफि यासीन इनामदार विरोधात (filed a complaint ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याची फिर्याद पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता भूषन सोनवणे यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
एखाद्या नागरिकाने लेखी व तोंडी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दिल्यास पोलीसांनी तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल करणे बंधनकारक होते,
परंतु वानवडी पोलीसांनी शासकीय कामात हलगर्जीपणा करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे.
गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्या बद्दल दप्तर दिरंगाई कायदा नुसार सहा.पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या विरोधात कारवाई होणे संदर्भात वरिष्ठ व न्यायालयात नककीच दाद मागणार आहोत.
अॅड वाजिद खान बिडकर