Homeताज्या घडामोडीवानवडी पोलीस स्टेशनमधील पी.एस.आय शेटये सहित 3 जणांवर निलंबनाची कारवाई.

वानवडी पोलीस स्टेशनमधील पी.एस.आय शेटये सहित 3 जणांवर निलंबनाची कारवाई.

( Wanwadi police station )वानवडी पोलीस स्टेशनमधील पी.एस .आय शेटये सहित 3 जणांवर निलंबनाची कारवाई.

suspension-proceedings-for-3-people-including-api-shete-of-wanwadi-police-station/

Wanwadi police station:पुणे शहर पोलीस खात्यात सध्यातरी मनमर्जी पणे कामे सुरू असून कनिष्ठांना वरिष्ठांची धाक राहिलेली नाही तसेच आता तर वरिष्ठांची दिक्षाभूल करण्याची देखील मजल वाढली आहे कारण आहे ये पैसा बोलता है?

असाच एक प्रकार वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वानवडी बाजारपोलीस चौकीत घडला आहे खाजगी मालमत्तेमध्ये वाढदिवस साजरा करणा-या तरूण-तरूणींना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांना मध्यरात्री पर्यंत डांबून ठेवून मोठ्ठी रक्कम मागण्यात आली होती.

ती रक्कम मिळाली नाही म्हणून रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत डांबून ठेवले होते, याची कुणकुण एका समाजिक कार्यकर्ताला लागली असता त्याने एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला संपर्क करुन हकीकत सांगितली व चक्रे गरागरा फिरू लागली,

पुढील बातमी : एका पैश्यावाल्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी मोहम्मदवाडी पोलीस चौकीचे ए. पी .आय कांबळेनी शाळा तोडण्याचे दिले आदेश .

तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी संबंधित पोलीसांना विचारणा केली असता त्यांना देखील माहिती खोटी देण्यात आली याची दखल स्वता पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी घेऊन तपासाचे आदेश दिले होते

त्यात दोषी आढळल्या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरिक्षक ए .ए.शेटये,

पोलीस कर्मचारी कृष्णा ननावरे, बाळू यादव, विकास टेमगिरे, यांना गुरूवारी रात्री निलंबित केल्याचे समजते,

तसेच निलंबना संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनीहि दुजोरा दिला आहे,कायद्याचा दुरुपयोग करण्यास वानवडी पोलीस पटाईत असल्याचे अनेक बळी पडलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे .व पैश्यासाठी किती हि लाचारी ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला अश्या अधिकारी व कर्मचारीमुळे प्रमाणिकपणे कामे करणा-यांचे अब्रूचे लकतरे टांगणीला जात आहे..

सदरील बातमीत सूरूवातीस दोन त्रुट्या आढळल्या होत्या जसेकी पी एस आय ऐवजी ए पी आय झाले होते व ए.ए.शेटये ऐवजी उपनिरीक्षक आसाराम शेटे झाले होते ते त्रुट्या अनावधानाने व तांत्रिक चुकीमुळे घडल्या होत्या सबंधीतांना झालेल्या मनस्तापा बद्दल (आम्ही ) सजग नागरीक टाइम्स दिलगीर आहोत झालेल्या चुकींना तत्काळ दुरूस्त करण्यात आले आहे.
(सजग नागरीक टाइम्स )

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular