Homeताज्या घडामोडीतासभर लिफ्टमध्ये अडकलेल्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

तासभर लिफ्टमध्ये अडकलेल्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

तासभर लिफ्टमध्ये अडकलेल्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे – आज(मंगळवार) दुपारी बारा वाजता सातारा रस्त्यावरील आदिनाथ शॉपिंग मॉलमधिल लिफ्ट बंद पडली,

लिफ्टमध्ये एक रुग्ण महिला व चार पुरुष होते अचानक लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर बंद पडल्याने सुमारे तासभर ते अडकले होते.

यावेळी एक लिफ्टमन ही यांच्यासोबत होता. परंतू, तासाभराचे प्रयत्न सफल होत नाहीत हे लक्षात येताच लिफ्टमधे अडकलेल्या इसमाने अग्निशमन दलाकडे सुटकेची मागणी केली.

अग्निशमन मुख्यालयातील जवान घटनास्थळी लगेचच पोहोचले.

लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर मधोमध अडकली असून यामधे एक रुग्ण महिला याच ठिकाणी एक्स-रे काढण्यासाठी आली होती. ते पाच ही जण घाबरलेले होते.

जवानांनी त्यांना धीर देत लिफ्ट रुममध्ये प्रवेश करुन अवघ्या दहा मिनिटातच सर्व पाच जणांना सुखरुप बाहेर काढले.

जवानांनी कर्तव्य बजावत केलेल्या कामाचे त्या पाच ही जणांनी आभार मानले.

या कामगिरीमधे प्र.अ. प्रदिप खेडेकर, वाहन चालक राजू शेलार, जवान छगन मोरे, शफिक सय्यद, मंगेश मिळवणे, रऊफ शेख, राजेश घडशी, विठ्ठल साबळे, दिक्षित, मेनसे, रणपिसे, तारु यांनी सहभाग घेतला.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular