आयपीएल 2017

AayapaIela 2017 : आयपीएलमधून असा कमावला जातो पैसा..
laoksattaa 12 eipa`la 2017 17:25
बीसीसीआयची आयपीएलमधून रग्गड कमाई

सोनी इंडियाकडे गेल्या दहा वर्षांपासून आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार आहेत.

आयपीएल म्हणजे बीसीसीसीआयसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचं म्हटलं जातं, पण देशातील या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या स्पर्धेतून पैसा नेमका कसा कमावला जातो असा प्रश्न अनेकांना पडतो. आयसीसीच्या स्पर्धेपेक्षाही जास्त मिळकत बीसीसीआयला आयपीएलमधून मिळते. तर ती कशी? याचा हा आढावा..
१. स्पॉन्सर्स-
आयपीएल स्पर्धेशी जोडले गेलेले असंख्य सॉन्सर्स हे या स्पर्धेच्या मिळकतीचे मुख्य साधन आहे. खेळाडूंच्या जर्सीपासून ते पंचांच्या टोपीवरील स्टिकरपर्यंत सर्वच गोष्टींसाठी येथे पैसा मोजला जातो. यंदाच्या आयपीएलमध्ये जिओनी मोबाईल कंपनी मुख्य स्पॉनर्स असल्याचे दिसून येते. जिओनी मोबाईलने कोलकाता नाईट रायडर्स संघासोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत मोठा करार केला आहे. जिओनी सोबतच इतर अनेक ब्रॅण्ड तुम्हाला खेळाडूंच्या जर्सीवर दिसून येतात. त्यासाठी प्रत्येक कंपनीला पैसे मोजावे लागतात.
२. सामन्याचे तिकीट-
ज्याप्रमाणे एखादे वृत्तपत्र वाचक संख्येवर अवलंबूत असते तसे आयपीएलचा प्रत्येक सामना देखील तिकीट विक्रीवर अवलंबून असतो. आयपीएलची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे सामन्याचे तिकीट देखील महागडे असते. पण त्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाला सुविधा देण्यावरही भर दिला जातो. आयपीएलमधील प्रत्येक सामन्यासाठी ६० टक्क्यांहून अधिक उपस्थिती असते. प्रत्येक संघाला त्यांच्या घरच्या मैदानात सामना असल्यास तिकीट विक्रीट ठराविक वाटा देखील दिला जातो. त्यामुळेच स्पर्धेतील प्रत्येक संघाचे त्यांच्या घरच्या मैदानात एकूण सात सामने खेळविण्यात येतात.
३. प्रसारणाचे अधिकार-
सोनी इंडियाकडे गेल्या दहा वर्षांपासून आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. सोनी इंडियाचा बीसीसीआयशी त्यासाठी ठराविक करार केला गेला आहे. बीसीसीआयने टीआरपी रेटिंगनुसार स्पर्धेतील प्रत्येक संघाला ठराविक रक्कम दिलेली असते. त्यानुसार बीसीसीआयचा प्रसारणकर्त्या वाहिनीसोबत करार करण्यात आलेला आहे. मग सोनी वाहिनी सामन्याचे प्रसारण सुरू असताना दाखविल्या जाणाऱया जाहिरातींच्या माध्यमातून आपली आर्थिक गरज पूर्ण करून घेते. सामन्याच्यामध्ये दिसणाऱया १० सेकंदाच्या जाहिरासाठी लाखो रुपयांची कमाई सोनी वाहिनीला जाहिरातदारांकडून मिळते. याशिवाय, आयपीएलने सामन्याचे ऑनलाईन प्रक्षेपणाचे अधिकार स्टार ग्रुपला दिले आहेत. स्टार ग्रुप आपल्या अॅपच्या माध्यमातून सामन्याचे प्रक्षेपण करण्यात येते. यासाठीही स्टार ग्रुपकडून ठराविक करारानुसार पैसा घेण्यात आला आहे.
४. मुख्य प्रायोजक-
आयपीएलच्या प्रत्येक पर्वात स्पर्धेचा मुख्य प्रायोजक म्हणून अधिकार खुले केले जातात. त्यासाठीचा लिलाव देखील केला जातो. यंदा विवो या मोबाईल कंपनीला स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शंभर कोटींच्या करारावर स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व विवो कंपनीला देण्यात आले आहे. यातील मोठा वाटा बीसीसीआयच्या तिजोरीत जातो.
५. ब्रॅण्ड व्हॅल्यू-
अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रिति झिंटा यांसारखे कलाकार या स्पर्धेला जोडले गेल्याने नक्कीच स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. याशिवाय, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंगसारख्या अनेक ब्रॅण्ड्सशी संलग्न असणाऱया खेळाडूंचा या स्पर्धेत समावेश असल्याने आयपीएलमध्ये कोटींची उलाढाल होते. शाहरुख खान स्वत: वीसहून अधिक ब्रॅण्ड्सशी जोडला गेला आहे. त्यामुळे हेच ब्रॅण्ड त्याला संघाचे स्पॉन्सर्सम्हणूनही सहज मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular