गाडीला जॅमर लावल्याने भाजप नगरसेवक संतापले

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

गाडीला जॅमर लावल्याने भाजप नगरसेवकाचा संताप, पोलिसांना दमदाटी प्रकरणी अटक.
पुणे : गाडी नो पार्किंगमध्ये उभी असताना पोलिसांनी जॅमर लावल्याने पुण्यातील भाजप नगरसेवक चांगलेच संतापले. बाणेर बालेवाडी प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल बालवडकर यांनी जेएम रोड येथे गाडी नो पार्कींगमध्ये उभी केली होती. वाहतूक पोलीसांनी गाडीला जॅमर लावल्याने अमोल बालवडकर यांनी पीआय शंकर ढामसे यांना दमदाटी केली होती.

दमदाटी केल्यानंतर वरिष्ठ पोलिसांना फोन करून पीआय ढामसे यांनी दारू पिऊन माझ्या गाडीवर कारवाई केल्याचंही अमोल बालवडकर यांच्याकडून सांगण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

याप्रकरणी रात्री उशीरा शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 353 अंतर्गत अमोल बालवडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयाने त्यांचा जामिन नामंजूर केल्याने त्याना 15दिवसाची येरवडा काराग्रहात रवानगी.

Advertisement

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल