ताज्या घडामोडीपुणे

मदत नव्हे कर्तव्य म्हणून ३५० राशनकिट वाटप

Advertisement

Ration kits Distributed : मदत नव्हे कर्तव्य म्हणून ३५० राशनकिट वाटप करून अझरुद्दीन सय्यद यांनी जपली सामाजिक बांधिलकी..

ration kits Distributed to 350 families

Ration kits Distributed : सजग नागरिक टाईम्स : पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने संपूर्ण देशात मागील एक महिन्यापासून संचारबंदी लागू आहे.

या बंदमुळे मजुरांना काम मिळेणासे झाले आहे. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत.

अनेक कुटुंबाना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे, नागरिकांच्या अनेक समस्यांचा विचार करून

मदत नव्हे कर्तव्य म्हणून हडपसर सय्यदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अझरुद्दीन सय्यद व मित्रपरिवारने गोरगरीब व गरजूंना १००० राशन किट वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

माजी महापौर सहित ३५ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल

हडपसर येथील सय्यदनगर,काळेपडळ, तरवडेवस्ती,सातवनगर,ससाणेवस्ती, रामटेकडी, कोंढवा, पापडेवस्ती,

Advertisement

ससाणेनगर येथे आतापर्यंत ३५० गरजूंना एका कुटुंबाला किमान १५ दिवस पुरेल एवढा किराणा व धान्यभुसार मालाचे किट मोफत वाटप करण्यात आले.

या किट मधे तेल,गहू,तांदूळ, साखर,२ प्रकारचे दाळ, कांदा लसूण मसाला, हळद, जिरा,मोहरी, मीठ व इत्यादी आवश्यक वस्तू आहे.

mk-digital-seva
https://mkdigitalseva.com

या वेळी अझरुद्दीन सय्यद यांनी सांगितले की गोरगरीब,मजूर, कामगार, समाज्यातील शोषित

व दुर्लक्षित घटक यांच्यासाठी १००० राशन किटचे टप्प्याटप्प्याने यापुढे ही वाटप होणार अाहे.

गोरगरीब , कामगार व गरजू लोकांसाठी मदत नव्हे कर्तव्य म्हणून काम करणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळात गरीबांच्या सोबत उभे राहणे गरजेचे आहे.

कोरोना साथी रोगामुळे समाजावर ओढलेली ही वेळ एकमेकांच्या सहकार्याने नक्कीच जाणार आहे, यात कोरोना हरणार व देश जिंकणार आहे.

यावेळी सुफियान मनियार, अशफाक शेख,अफरोज कुरेशी,नितीन सोनवणे, रेहान अंसारी व आदी उपस्थित होते.

Hadapsar | Lockdown च्या काळात Smile Foundation तर्फे गरजुंना रेशनकिट ची मदत

Share Now