माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख यांनी तोडले भाजपाशी संबंध

NRC / CA A issue: मी यापुढे भाजपाशी आपले संबंध तोडत आहे : माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख

Former standing committee chairman Rashid Shaikh out of BJP

NRC / CA A : सजग नागरिक टाइम्स :  NRC / CA A या कायद्यामुळे सध्या देशभर मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे .

अल्पसंख्यांक व भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी

पुणे महानगरपालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली .

त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या भडिमाराला उत्तर  देताना रशीद शेख यांनी सांगितले कि ,

सब का साथ सब का विकास या एका वाक्याच्या जोरावर मी आपणा सर्वांच्या कल्याणार्थ भाजपामध्ये सामील झालो होतो ,

former-standing-committee-chairman-rashid-shaikh-out-of-bjp-nrc-caa-issue

परंतु सदर कायद्यामुळे मी स्वतः सुध्दा अंत्यत नाराज झालेलो असून मी आपणास सांगू इच्छितो कि , मी यापुढे भाजपाशी आपले संबंध तोडत आहे .

वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी पक्षाशी अगर पक्षातील कोणाही नेता कार्यकर्त्यांशी माझी कुठल्याही  प्रकारची नाराजी नाही ,

परंतु अशा वातावरणात पक्ष सोडून राहणेच मला योग्य वाटते . म्हणून मी , रशीद शेख भाजपाशी माझा राजकीय संबंध तोडत आहे

आणि यापुढे धर्मनिरपेक्ष तत्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या वर्गासाठी सातत्याने मी आपणा सर्वांना सोबत घेऊन काम करीत राहील असे रशीद शेख म्हणाले.