पुणे: गेले पंचवीस वर्ष पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले. अनिस सुंडके एमआयएम पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या होत्या.
गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांची आज 16/04/2024 रोजी औरंगाबाद येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची निवडणूक प्रचारासाठी आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघ येथून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी औरंगाबाद व पुणे येथील अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.
खासदार ओवेसी यांनी सांगितले की आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकतीने उतरणार आहोत आम्ही का निवडणूक लढू नये निवडणूक लढविले पाहिजे अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे मला खात्री आहे की पुण्याची लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील.
जय भीम जय मीमचा नारा देत सर्व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्याचा निर्धार एम आय पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिस सुंडके व पुण्यातील पक्षाचे सर्व पद अधिकाऱ्यांनी घेतले आहे.
याप्रसंगी बोलताना अनिस सुंडके यांनी सांगितले की गेल्या पंचवीस वर्षापासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावल्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर शरद चंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत काम केलेले आहे. पुणे महानगरपालिकेत मी अनेक पद भूषविलेले असून पश्चिम महाराष्ट्र येथे सर्व धर्म लोकांशी माझे चांगले संपर्क आहे पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक काम केल्याची माहिती अनिस सुंडके यांनी दिली.
अनिस सुंडके यांनी सांगितले की राजकारणात असताना अनेक वर्षांचा हो विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. समाजाच्या प्रश्नांचा अनुभव असल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा एमआयएम पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेण्यात येईल.