TIPU PATHAN याच्या भावजयीच्या ऑफिसची पोलिसांकडून तोडफोड
दोन जण जखमी, वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप.
१८ एप्रिल २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलिस एपीआय कृष्णा बाबर व राज शेख आणि अतुल पवार व इतर कर्मचारी टिपू पठाण याची माहिती घेण्यासाठी सय्यदनगर मध्ये असलेल्या इफरा सिक्युरिटी गार्ड कंपनी मध्ये गेले होते. परंतु तेथे त्यांच्या हाती काहीच न लागल्याने रागात येऊन एपीआय कृष्णा बाबर,शेख, पवार यांनी ऑफिस मधील व बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांची नासधूस केली.व तेथील काही लोकांना जबर मारहाण केली आहे.
गुन्हेगारांना चौकशीसाठी नेने गुण्ह्याचा तपास करणे, कायदा सुव्यवस्था राखणे हा कायद्याचा भाग आहे .परंतु त्याच्या नातेवाईकांच्या घरात ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करण्याचे अधिकार पोलिसांना दिले कोणी ? असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
ऑफिसचे तोडफोड करणाऱ्या व दोन नागरीकांना मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या गुन्हे शाखा 5 च्या दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाचे पाय फॅक्चर झाले असून दोन्ही जण वानवडी पोलिस ठाण्यात रात्रभर तक्रार देण्यासाठी बसले होते तरीही वानवडी पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता त्यांना तसेच घरी पाठवले.
संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी सिक्युरिटी गार्ड कंपनीचे संचालक व जखमी नागरिकांनी केली आहे.