Scrapwala :भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळील प्रकार..
Scrapwala : सजग नागरिक टाइम्स : पुणे : उद्योग तुमचा पैसा दुस-याचा हि म्हण तर ऐकली असेल पण त्याला साकार केलय भवानी पेठेतील भंगार वाल्यानी,
भवानी पेठेतील अधिकारी कर्मचारी इतके मोठ्या मनाचे आहे कि ,
काशिवाडी येथील भंगार वाले त्यांच्या दुकानात निघणारा थर्माकोल चा कचरा हा रस्त्यावर फेकून देतात,
तर भवानी पेठेतील अधिकारी कर्मचारी हे तो कचरा मनपाच्या गाडीत भरून डेपो मध्ये फेकून येतात त्यांच्या कडून एक रुपयाही दंड न घेता,
या सर्व प्रक्रियेत मनपा चे दररोज हजारो रुपये खर्च होत असून भंगारवाले मात्र पैसे कमविण्यात मस्त आहे.
अश्या बेफिकीर अधिकारी व कर्मचारी कडूनच सर्व खर्च वसूल करण्यात यावे अशी मागणी नागरीकांमधून होत आहे .
सदरील कचरा हा स्थानिक नगरसेविकेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर टाकला जातो .
तसेच या ठिकाणी फुटपाथ व बस स्टॉप बनविण्यास मनपा ने लाखो रुपये खर्च ही केले आहे .
आरटीओत सॅनिटायझरच्या नावाने होतेय वाहन चालकांची लुट
यासंदर्भात भवानी पेठेच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी काहीही न सांगता काढता पाय घेतला .
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी भंगारवाल्यावर ऐवढे मेहरबान का ?
दोषींवर दंडात्मक कारवाई होउन फुटपाथ मोकळे होणार का ?
या सर्व प्रकारात भवानी पेठेतील अधिकारींचे साटेलोटे तर नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे ?