Homeताज्या घडामोडीआरटीओत सॅनिटायझरच्या नावाने होतेय वाहन चालकांची लुट

आरटीओत सॅनिटायझरच्या नावाने होतेय वाहन चालकांची लुट

Sanitizer in RTO : रिक्षा चालकांनी ५० रुपयांची पावती केली नाही तर अधिकारी गाडीत बसणार नसल्याची धमकी


Drivers are robbed in the name of sanitizer in RTO

Sanitizer in RTO :सजग नागरिक टाइम्स :पुणे :लॉकडाऊन मुळे रिक्षा चालकाचे जीव मेटाकुटीला आले असताना पुणे RTO मध्ये सॅनिटायझरच्या नावाखाली बळजबरीने पैसे उकलण्याचे प्रकार चालू आहे,

रिक्षा चालकांनी ५० रुपयांची पावती केली नाही तर अधिकारी गाडीत बसत नसल्याची धमकी सॅनिटायझर वाल्याकडून दिली जाते ,

वाहन पासिंगसाठी दिवे घाट आर टी ओत जावे लागते ,वाहन चालकांना एवढ्या लांब जाऊन तासंतास रांगेत उभे राहून परत घरी जाण्यापेक्षा मजबुरीत 50 रुपये द्यावे लागत आहे.

VIDEO पहा

वाहन पासिंगसाठी दर रोज दिवे घाट आर टी ओत शेकडो वाहन येत असून हजारो रुपयांचा भुर्दंड वाहन चालकाना सोसावा लागत आहे,

सॅनिटायझर च्या नावाखाली लूट होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी आरटीओकडे केली आहे.

या लुटी मागे अधिकारी वर्ग असल्याशिवाय अशे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही,

जर यात अधिकारी शामिल नसतील तर सदरिल लुट कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे, या लूटीला आरटीओच जबाबदार आहे

या लुटमार करना-यावर कडक कारवाई होणार का ?

तिकिटांचा काळाबाजार.१० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प १४ रुपयाला

या लुटमारी संदर्भात आर टी ओ चे अधिकारी अजित शिंदे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि त्यांना आम्ही परवानगी दिलेली नाही,

हे आम्हाला तुमच्या कडूनच माहित झाले असे सांगून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याचे तोंडी आदेश हि शिंदे यांनी दिले.

या लुटमार करना-यावर कडक कारवाई होणार का याच्यावर वाहन चालकाचे लक्ष लागून आहे.

५ लाखांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून FIR दाखल

Share Now
RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

Most Popular

Recent Comments