वृत्तपत्र मालक संपादक संघाची ऑगस्टमध्ये परिषद: वृत्तपत्र मालक संपादक संघाचे ऑगस्टमध्ये राज्यव्यापी परिषद
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे ,राज्यातून मालक संपादक राहणार उपस्थित.(Newspaper owners editor council)
पुणे वृत्तपत्र मालक संपादक संघाची व्याप्ती सर्वत्र राज्यभर वाढली असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारणी जाहीर होत आहे
राज्यातील वृत्तपत्रांना भेडसावणाऱ्या समस्यावर सविस्तर चर्चा या परिषदेत होणार आहे अशी माहिती वृत्तपत्र मालक संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष डी एस डोने
व कार्याध्यक्ष मेहबूब सर्जे खान यांनी सजग नागरिक टाईम्सशी बोलताना दिली.(Newspaper owners editor council)
परिषद घेण्याबाबत राज्य कार्य करण्याची बैठक नुकतेच पुणे येथे पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला,
यावेळी केंद्र शासनाकडून वृत्तपत्राच्या बाबतीत निर्णय घेताना प्रामुख्याने क वर्गातील दैनिकावर अन्याय होत असल्याची भावना क वर्ग वृत्तपत्र मालक संपादकांनी व्यक्ती केली
या समस्या बाबत राज्यातील मालक संपादकांना एकत्रित करून सरकार वर वृत्तपत्राच्या समस्या सोडवण्यासाठी वृत्तपत्र मालक संपादक संघ प्रयत्न करणार आहे
या सरकारच्या विविध मंत्र्यांशी याबाबत संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष डी एस डोने चर्चा करत असून ऑगस्ट महिन्यात याला मूर्त स्वरूप येणार आहे
या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे उपस्थित राहणार आहेत यावेळी राज्य उपाध्यक्ष रमेश भाई पांड्या
गोपाळ कुलकर्णी जनरल सेक्रेटरी संदीप भंडारे आदींच्या सह सर्व राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते .