पत्रकार मारहाण प्रकरणात वानवडी पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्या प्रकरणी Assistant Police Inspector responsible ,
पुणे प्रतिनिधी “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी आज पत्रकारावरील हल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यात पुणे पोलीसांचा पण सावत्रपणा समोर येत आहे,
पत्रकार विरोधात खोटे गुन्हे दाखल करायला हि पोलीस मागे पुढे पाहत नाहीत किंवा साधी चौकशी सुध्दा करत नाही,
असाच एक प्रकार पुण्यातील पत्रकार मजहर खान यांच्या बाबतीत घडला. हडपसर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या शांळानमध्ये चालत असलेले गैरकाभार,
अनागोंदी कारभार मजहर खान यांनी उघडकीस आणल्याने व शाळेचे बांधकाम संदर्भात विविधी शासकीय कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती,
त्याची दखल घेत पुणे महानगरपालिका,शिक्षण मंडळाने सदरील शाळेची मान्यता का रद्द करू नये म्हणून शाळेला नोटिस बजावली होती,
या सर्वांचा राग मनात धरून सदरील ट्रस्टचा संचालक शफि यासीन सय्यद(इनामदार) त्याची मुले व त्याच्या साथीदारांनी खान यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण केली होती.
व खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते. तसेच मारहाणीची तक्रार खान यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दिली असता वानवडी पोलीसांनी तक्रार 4 दिवस उशिरा घेतली,
त्या संदर्भात मजहर खान यांनी पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे कडे लेखी तक्रार करून दाद मागितली होती,
त्या संदर्भात प्राधिकरणाने तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (api) आसाराम शेटे यांना खुलासा करायला सांगितला होता,
तो खुलासा समाधानकारक न दिल्याने व सदरील सविस्तर जवाब नोंदवून न घेता सहा. पोलीस निरीक्षक शेटे यांनी हेतूत टाळाटाळ केली आहे तसेच कलमे वाढविण्यात यावी तक्रारीत असताना हि कलमे वाढविण्यात आलेली नाही
आणि 354 सारख्या विनयभंगाचा गुन्हा पूर्वीनियोजीत कटा प्रमाणे दाखल करण्यासाठी एक प्रकारे मुभाच उपलब्ध करून दिली असे मानण्यास भरपूर वाव असल्याचे दिसते असे पोलीस तक्रार प्राधिकरणाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे,
पुढे प्राधिकरणाने अहवालात म्हटले आहे कि रस्त्यावरच्या ये जा करणा-या लोकांनी अचानकपणे येउन तक्रारदार मजहर खान यांना लाठ्या काठ्यांनी लोखंडी रोडने गंभीरपणे ठोकून काडणे
या गोष्टी अपवादात्मक परिस्थितीत अगदी अशक्य नसल्यातरी प्रस्तुत प्रकरणातील संपूर्ण पार्श्वभूमीवर सकृतदर्शनी तर्काच्या पलीकडे वाटतात,
तक्रारदार खान यांनी दाखल केलेल्या त्यांच्या मारहाणीच्या जखमांचे फोटो आणि वैद्यकीय प्रमाणपत्र पाहिले असता गुन्हयाचे गांभीर्य लक्षात येते आणि घटना तारखे पूर्वी किती दिवस अगोदर कट शिजत होता हे ही स्पष्ट होते.
31/10/2018 च्या जबाबाप्रमाणे गुन्ह्यास (भा्.द.वी कलम 363(अपहरण),395(चोरी) इ.योग्य ती कलमे लावून,आरोपीच्या घराची/कार्यालयाची झडती घेउन पैसे जप्त करणे,
पिस्तूल जप्त करणे,सी.सी.टी.व्ही फुटेज जप्त करणे इत्यादीचा कोणताही तपास गांभीर्याने केलेला नाही . (Assistant Police Inspector responsible)
त्यासाठी प्राधिकरण त्यांना जबाबदार धरत असल्याचे हि प्राधिकरणाने अवर मुख्य सचिव (गृह) विभाग मुंबई व पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे,
या संदर्भात पत्रकार परिषद घेउन माहिती देण्यात आली त्यात अॅड समिर शेख अॅड सुफियान मु शेख , मजहर खान,अजहर खान उपस्थित होते.
उपरोकत प्रकरणात फेरतपास करून पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात यावे तसेच प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार जरब बसेल अशी कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात पैंशाच्या जोरावर न्याय विकला जाणार नाही आणि फिर्यादीला पोलीस खात्यातर्फे नुकसान भरपाई मिळावी. अॅड समिर शेख