Homeताज्या घडामोडीगरुडझेप शिवज्योत मोहीम पुण्यात दाखल ;

गरुडझेप शिवज्योत मोहीम पुण्यात दाखल ;

(Garudzep Shivajyot mohim) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगऱ्याहून झालेल्या सुटकेच्या स्मरणार्थ बाराशे किलोमीटरचा पायी पल्ला पार ; बाबासाहेब कुकडे

(Garudzep Shivajyot mohim) सजग नागरिक टाइम्स : पुणे, (ता.२८): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १७ ऑगस्ट १६६६ रोजी झालेल्या आग्राहून सुटकेच्या स्मरणार्थ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज ऍडव्होकेट मारुतीआबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा ते राजगड गरुडझेप मोहीम राबविण्यात आली आहे.

दरम्यान,१७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आगऱ्यातील असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून व स्थानिक आमदार योगेंद्र उपाध्याय व इतिहास संशोधक डॉ. सुमन आनंद यांच्या हस्ते राजगडाच्या मातीचे पूजन व शिवज्योत प्रज्वलित करत गरुडझेप मोहिमेचा प्रारंभ झाला.

त्यानंतर,२४ ऑगस्ट रोजी शिवज्योत घेऊन मावळे महाराष्ट्रभूमीत दाखल झाले होते.

वाचा : आगामी महापालिका निवडणुकीत “एक वार्ड – एक नगरसेवक”

उत्तर महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत मावळे २९ ऑगस्टला राजगडावर पोहचणार आहेत.

ही मोहीम शिवज्योत घेऊन आज सकाळी पुण्यात दाखल झाली.

पुण्यासह महाराष्ट्रभरातील जनतेने या मोहिमेतील सर्व मावळ्यांचे मनापासून आदरतिथ्य केले.

महाराजांच्या आगऱ्याहून झालेल्या सुटकेला ३५५ वर्ष पूर्ण होत आहेत.

साधारण बाराशे किलोमीटरचे अंतर पार करून उद्या (२९) गरुडझेप मोहीम राजगडावर सकाळी आठ वाजता पोहचणार आहे.

नंतर, अभिषेक व स्वागत समारंभ आणि नेत्रचिकित्सा शिबीर होणार असून, अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमचा शेवट होणार आहे.

या मोहिमेत सरनौबत पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज ऍडव्होकेट मारुतीआबा गोळे,

कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे,

जाधव घराण्याचे वंशज गणेश जाधव व तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे यांचेसह एकूण ७२ मावळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत.


‘३५५ वर्ष होऊनही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ढगधगता इतिहास मावळ्यांनी जागवीला आहे. बाराशे किलोमीटर अंतर धावून त्यांनी महाराजांच्या प्रति असणाऱ्या जिव्हाळ्याचे दर्शन उन वारा पाऊस यांची तमा न बाळगता दाखवून दिले. आजही छत्रपतींचा खरा मावळा महाराजांनी दाखवून दिलेल्या वाटेवर चालतो आहे याचा आनंद होतो आहे. गरुडझेप मोहिमेतील सहभागी मावळ्याचे आणि आमचे मार्गदर्शक मारुतीआबा गोळे यांचे मनापासून अभिनंदन करतो.’

— सरनौबत योगेश गोळे

वाचा : एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पातील कनिष्ठ लिपीक महिलेला लाच घेताना अटक,

Share Now
RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

Most Popular

Recent Comments