Homeताज्या घडामोडीगणपती विसर्जनासाठी १५० फिरत्या हौदाची व्यवस्था.

गणपती विसर्जनासाठी १५० फिरत्या हौदाची व्यवस्था.

पुणे : गणपती विसर्जनासाठी महापालिकेची पूर्वीपासून विसर्जन व्यवस्था असतानाही , महापालिकेने यंदा १५० फिरत्या हौदांसाठी निविदा काढण्याचा घाट घातला होता . गुरुवारी त्या निविदांपैकी मागिल वर्षी ज्यांनी महापालिकेला ६० फिरते हौद पुरविले होते ,

त्याच ठेकेदाराला यंदा पुन्हा १५० फिरते हौद पुरविण्याचे काम देण्यात आले आहे . सिद्धी अडव्हटाईर्सिंगने महापालिकेच्यावतीने कोरोना आपत्तीमुळे गतवर्षी ६० फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती . हे हौद . सातव्या दिवसापर्यंत कार्यरत न झाल्याने मोठी प्रमाणात टीकेची झोड उठली होती .

त्यामुळे यावर्षी तरी कोणीही केलेली मागणी महापालिकेने दिलेली ही १५० फिरतते हौद नसतानाही हौदांची सेवा वेळेत उपलब्ध होणार का याबाबत शंका होती .

शहरातील मात्र , गुरुवारी म्हणजे गणेश स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी या कामाची वर्क ऑर्डर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली . पाचव्या दिवसापासून विविध भागांत हे १५० फिरते हौद सेवा देणार आहेत .

नागरिकांकडून मागणी झाल्यास तिसऱ्या दिवसापासून ते उपलब्ध करून दिले जातील , अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली . १ कोटी ३५ लाख रुपयांचे हे काम १ कोटी ४१ रुपयांना दिले .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular