ताज्या घडामोडी

Bjp विरोधात Raj Thackeray यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

Advertisement

शिवतिर्थावर पक्षाच्या विराट गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे.

raj-thackeray-gudi-padwa-speech-2019-modi-amit-shah-congress
व्हिडीयो पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा:

?Raj Thakeray;मी सर्वाना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवनवर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि मोदी मुक्त भारत व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो.

?येत्या काही दिवसात माझ्या महाराष्ट्रभर ८ ते १० सभा होणार आहेत.

?भाजपवाल्यांची कुजबुज सुरु आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे वापरून घेत आहे. मी इतका वेडा नाहीये.

?मोदी आणि शाह मुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूका न लढवता देखील मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला.

हेपण वाचा : कायद्याच्या चौकटीत बसवून (Dictatorship) हुकूमशाहीचा अंमल सुरू

?७१ला बांगलादेश मुक्तीच्या लढाईनंतर राष्ट्रीय स्वयंकसेवक संघाने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ७७ला काँग्रेस मतदान करणारे मतदार आणीबाणीनंतर जनता पक्षाकडे वळले. १९८४ ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हेच झाले. जेंव्हा जेंव्हा देश संकटात असतो तेंव्हा तेंव्हा वेगळा विचार करणं आवश्यक असतं.

?देश संकटातून काढायचं असेल तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, मी म्हणून सांगतो आत्ता जो निर्णय घेतलाय तो विधानसभेला पण लागू आहे असं अजिबात नाही.

?आमच्या पंतप्रधानांची ओळख जगभरात फेकू अशी असते, इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला तर मोदींच नाव येतं. ही आपल्या पंतप्रधानांची इमेज आहे जगभरात.

?पाकिस्तानचं विमान पाडलं असं नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यांनंतर सांगितलं. पण आजच एक बातमी आहे की ज्या अमेरिकेने f १६ विमानं पाकिस्तानला पुरवली आहेत त्यांनीच स्पष्टपणे सांगितलं की पाकिस्तानच एक विमान पाडलं गेलं नाही.

?नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळालं, अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळालं नाही. इतकं अफाट बहुमत घेऊन आलेला हा पंतप्रधान पण देशाची पार वाट लावून टाकली. अगदी अडवाणींच उदाहरण घ्या त्यांना काय वाटत असेल आज?

हेपण वाचा : Bjp च्या जाहिरातीतील Harisal मधील मुलगा मनसे च्या स्टेजवर

?मला कोणाच्या खाजगी आयुष्यात जायचं नाही पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो.

?काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून त्यांनी भाजपने स्वतःच्या योजना म्हणून घोषित केली. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत आणि भाजपला पंतप्रधान किंवा भाजप हीच का नावं सुचतात? आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसं जन्माला आली पण त्यांची नावं प्रकल्पाना का देत नाही?

?मोदींनी सत्तेत आल्यावर आधार कार्ड योजनेचं जोरदार समर्थन केलं पण हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकेल, घुसखोरांच फावेल, माझ्या नागरिकांना मिळणारे फायदे स्वतः लुबाडतील. एवढा विरोध होता मग आधार कार्ड योजना का राबवली?

?नमामि गंगेसाठी २० हजार कोटी खर्च करू म्हणाले ,गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळलं नाही. जी.डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी १११ दिवस उपोषण करून ते वारले.

?नोटबंदीमुळे ४ कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकं रांगेत मृत्यमुखी पडली, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावत आहेत.

?मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो की नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. तेच त्यांनी केलं. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली. सैनिकांच्या हौतात्म्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न मोदींनी केला.

?जवान अत्यंत खडतर परिस्थितीत देशाच्या सीमा राखत असतात, पण त्यांच्यासाठी काही करायचं मोदींना गेल्या ५ वर्षात सुचलं नाही पण त्यांच्या शौर्यावर नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्याची स्वप्न बघत आहेत. ह्याची लाज कशी वाटत नाही?

?आमच्या जवानांवरती काश्मीरमध्ये हल्ले होत होते, स्थानिक लोकं त्यांच्यावर हल्ले करत होते, पण जवान काही करू शकत नाही कारण त्यांना भिती आहे आपल्यावर कारवाई होणार. नरेंद्र मोदी नवाज शरीफांना भेटायला, केक भरवायला गेले, आणि त्यानंतर लगेच पठाणकोट हल्ला झाला, उरी झालं.

हेपण वाचा : ठरलं.. मनसे करणार काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार!

?अमित शाह नी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केलं की आम्ही २५० माणसं मारली. अमित शाह गेले होते का को पायलट म्हणून? एअर चीफ मार्शल म्हणतात की आम्हाला किती माणसं गेली ह्याचा आकडा देता येणार नाही मग भाजपने कुठून हा शोध लावला?

?ह्यावर कोणी प्रश्न विचारायचं नाही, कारण कोणी विचारलं की म्हणायचे हा देशद्रोही आहे म्हणून. ही देशद्रोही कल्पना देखील एडॉल्फ हिटलरची, त्याने देखील त्याला विरोध करणाऱ्याला प्रत्येकाला देशद्रोही ठरवायचा. हेच मोदी करत आहेत.

?नोटबंदीनंतर देशात ४कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या,९९.३%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटबंदी ही अपयशी ठरली. त्यावेळी मोदी म्हणाले होते की जर ५० दिवसात सगळं सुरळीत नाही झालं तर मला कोणत्याही चौकात उभं करा आणि मला हवी त्या शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा आता, शिक्षा द्यायला आम्ही येतो.

?नरेंद्र मोदी म्हणाले होते की बीफ एक्स्पोर्ट करणारे माझे अनेक जैन मित्र आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये गायी पोषक अन्न मिळालं नाही म्हणून गेल्या. हे कोणतं भाजपचं आणि मोदींचं गो प्रेम. आणि तरीही गोबंदीच्या नावाखाली अनेक माणसांना मारलं गेलं तरी मोदी शांत होते.

?अमरावती मधलं हरिसाल नावाचं डिजिटल गाव घोषित केलं, त्या गावाची अवस्था आम्ही शोधून तुमच्या समोर आणली आहे. गावात रेंज नाही, डॉक्टर नाही, लोकांकडे मोबाईल नाहीत, बँकेला एटीएम नाही. जाहिरातीत ज्याला मॉडेल म्हणून उभं केलं तो म्हणतो त्याला काहीच फायदा झाला नाही.

?हे तुमचं सरकार लाभार्थीच्या घोषणा करणारं सरकार? किती खोटं बोलणार? पंतप्रधान खोटं बोलतात. आणि ह्यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मोदी देत नाहीत, भाजपचे नेते देत नाहीत आणि अंधभक्त देत नाहीत. पण एकच प्रश्न विचारतात ‘मोदींना पर्याय काय?’

?नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवलं, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेंव्हा लोकांना पर्याय होता का? मग आत्ताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार?

?नोटबंदीच्या आधी भारतीय जनता पक्षाने देशभरात जमिनी घेऊन ठेवल्या आणि दिल्लीत तर १ लाख ७० हजार स्क्वेअर फुटांचं ऑफिस बांधलं. एवढं आलिशान सेवन स्टार ऑफिस बांधायला पैसे कुठनं आले?

?नोटबंदीनंतर बरोबर १ महिन्यांनी आंध्र प्रदेश मधल्या सीकर रेड्डी ह्यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले तेंव्हा ३३ कोटी रुपयांच्या नवीन २ हजाराच्या नोटा सापडल्या. घरी असे पैसे सापडत असतील तर असे पैसे किती बाहेर पडले असतील? हेच पैसे भाजप वापरत आहे.

?२०१४ च्या अगोदर भारतात जेवढी कॅश होती त्यापेक्षा काही पटींनी अधिक कॅश भारतात उपलब्ध असल्याचा आरबीआयने अहवाल दिला आहे ही कॅश आली कुठून?

Advertisement

?देश इतका खड्ड्यात घालून पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर हे पुन्हा पैसे वाटायला येत आहेत, मी सांगतो आले पैसे द्यायला तर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. ह्या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या. मोदी आणि शाह हे राजकीय क्षितिजावरून घालवायचे आहेत म्हणून काळजावर दगड ठेवून मतदान करा.

?मी सर्वाना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवनवर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि मोदी मुक्त भारत व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो.

हेपण वाचा :घुसखोरीविरोधात(Chowkidar) चौकीदारच संरक्षण करणार – मोदी

?येत्या काही दिवसात माझ्या महाराष्ट्रभर ८ ते १० सभा होणार आहेत.

?भाजपवाल्यांची कुजबुज सुरु आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे वापरून घेत आहे. मी इतका वेडा नाहीये.

?मोदी आणि शाह मुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूका न लढवता देखील मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला.

?७१ला बांगलादेश मुक्तीच्या लढाईनंतर राष्ट्रीय स्वयंकसेवक संघाने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ७७ला काँग्रेस मतदान करणारे मतदार आणीबाणीनंतर जनता पक्षाकडे वळले. १९८४ ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हेच झाले. जेंव्हा जेंव्हा देश संकटात असतो तेंव्हा तेंव्हा वेगळा विचार करणं आवश्यक असतं.

?देश संकटातून काढायचं असेल तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, मी म्हणून सांगतो आत्ता जो निर्णय घेतलाय तो विधानसभेला पण लागू आहे असं अजिबात नाही.

?आमच्या पंतप्रधानांची ओळख जगभरात फेकू अशी असते, इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला तर मोदींच नाव येतं. ही आपल्या पंतप्रधानांची इमेज आहे जगभरात.

?पाकिस्तानचं विमान पाडलं असं नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यांनंतर सांगितलं. पण आजच एक बातमी आहे की ज्या अमेरिकेने f १६ विमानं पाकिस्तानला पुरवली आहेत त्यांनीच स्पष्टपणे सांगितलं की पाकिस्तानच एक विमान पाडलं गेलं नाही.

?नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळालं, अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळालं नाही. इतकं अफाट बहुमत घेऊन आलेला हा पंतप्रधान पण देशाची पार वाट लावून टाकली. अगदी अडवाणींच उदाहरण घ्या त्यांना काय वाटत असेल आज?

?मला कोणाच्या खाजगी आयुष्यात जायचं नाही पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो.

?काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून त्यांनी भाजपने स्वतःच्या योजना म्हणून घोषित केली. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत आणि भाजपला पंतप्रधान किंवा भाजप हीच का नावं सुचतात? आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसं जन्माला आली पण त्यांची नावं प्रकल्पाना का देत नाही?

?मोदींनी सत्तेत आल्यावर आधार कार्ड योजनेचं जोरदार समर्थन केलं पण हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकेल, घुसखोरांच फावेल, माझ्या नागरिकांना मिळणारे फायदे स्वतः लुबाडतील. एवढा विरोध होता मग आधार कार्ड योजना का राबवली?

?नमामि गंगेसाठी २० हजार कोटी खर्च करू म्हणाले ,गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळलं नाही. जी.डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी १११ दिवस उपोषण करून ते वारले.

?नोटबंदीमुळे ४ कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकं रांगेत मृत्यमुखी पडली, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावत आहेत.

?मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो की नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. तेच त्यांनी केलं. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली. सैनिकांच्या हौतात्म्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न मोदींनी केला.

?जवान अत्यंत खडतर परिस्थितीत देशाच्या सीमा राखत असतात, पण त्यांच्यासाठी काही करायचं मोदींना गेल्या ५ वर्षात सुचलं नाही पण त्यांच्या शौर्यावर नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्याची स्वप्न बघत आहेत. ह्याची लाज कशी वाटत नाही?

?आमच्या जवानांवरती काश्मीरमध्ये हल्ले होत होते, स्थानिक लोकं त्यांच्यावर हल्ले करत होते, पण जवान काही करू शकत नाही कारण त्यांना भिती आहे आपल्यावर कारवाई होणार. नरेंद्र मोदी नवाज शरीफांना भेटायला, केक भरवायला गेले, आणि त्यानंतर लगेच पठाणकोट हल्ला झाला, उरी झालं.

?अमित शाह नी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केलं की आम्ही २५० माणसं मारली. अमित शाह गेले होते का को पायलट म्हणून? एअर चीफ मार्शल म्हणतात की आम्हाला किती माणसं गेली ह्याचा आकडा देता येणार नाही मग भाजपने कुठून हा शोध लावला?

?ह्यावर कोणी प्रश्न विचारायचं नाही, कारण कोणी विचारलं की म्हणायचे हा देशद्रोही आहे म्हणून. ही देशद्रोही कल्पना देखील एडॉल्फ हिटलरची, त्याने देखील त्याला विरोध करणाऱ्याला प्रत्येकाला देशद्रोही ठरवायचा. हेच मोदी करत आहेत.

?नोटबंदीनंतर देशात ४कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या,९९.३%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटबंदी ही अपयशी ठरली. त्यावेळी मोदी म्हणाले होते की जर ५० दिवसात सगळं सुरळीत नाही झालं तर मला कोणत्याही चौकात उभं करा आणि मला हवी त्या शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा आता, शिक्षा द्यायला आम्ही येतो.

?नरेंद्र मोदी म्हणाले होते की बीफ एक्स्पोर्ट करणारे माझे अनेक जैन मित्र आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये गायी पोषक अन्न मिळालं नाही म्हणून गेल्या. हे कोणतं भाजपचं आणि मोदींचं गो प्रेम. आणि तरीही गोबंदीच्या नावाखाली अनेक माणसांना मारलं गेलं तरी मोदी शांत होते.

?अमरावती मधलं हरिसाल नावाचं डिजिटल गाव घोषित केलं, त्या गावाची अवस्था आम्ही शोधून तुमच्या समोर आणली आहे. गावात रेंज नाही, डॉक्टर नाही, लोकांकडे मोबाईल नाहीत, बँकेला एटीएम नाही. जाहिरातीत ज्याला मॉडेल म्हणून उभं केलं तो म्हणतो त्याला काहीच फायदा झाला नाही.

?हे तुमचं सरकार लाभार्थीच्या घोषणा करणारं सरकार? किती खोटं बोलणार? पंतप्रधान खोटं बोलतात. आणि ह्यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मोदी देत नाहीत, भाजपचे नेते देत नाहीत आणि अंधभक्त देत नाहीत. पण एकच प्रश्न विचारतात ‘मोदींना पर्याय काय?’

?नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवलं, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेंव्हा लोकांना पर्याय होता का? मग आत्ताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार?

?नोटबंदीच्या आधी भारतीय जनता पक्षाने देशभरात जमिनी घेऊन ठेवल्या आणि दिल्लीत तर १ लाख ७० हजार स्क्वेअर फुटांचं ऑफिस बांधलं. एवढं आलिशान सेवन स्टार ऑफिस बांधायला पैसे कुठनं आले?

?नोटबंदीनंतर बरोबर १ महिन्यांनी आंध्र प्रदेश मधल्या सीकर रेड्डी ह्यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले तेंव्हा ३३ कोटी रुपयांच्या नवीन २ हजाराच्या नोटा सापडल्या. घरी असे पैसे सापडत असतील तर असे पैसे किती बाहेर पडले असतील? हेच पैसे भाजप वापरत आहे.

?२०१४ च्या अगोदर भारतात जेवढी कॅश होती त्यापेक्षा काही पटींनी अधिक कॅश भारतात उपलब्ध असल्याचा आरबीआयने अहवाल दिला आहे ही कॅश आली कुठून?

?देश इतका खड्ड्यात घालून पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर हे पुन्हा पैसे वाटायला येत आहेत, मी सांगतो आले पैसे द्यायला तर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. ह्या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या. मोदी आणि शाह हे राजकीय क्षितिजावरून घालवायचे आहेत म्हणून काळजावर दगड ठेवून मतदान करा असे Raj Thackeray सभेत म्हणाले.

Share Now

3 thoughts on “Bjp विरोधात Raj Thackeray यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

Comments are closed.