घुसखोरीविरोधात चौकीदारच (Chowkidar) संरक्षण करणार – मोदी
(Chowkidar News) आसाम व ईशान्येकडील इतर राज्यांत १९७० पासून काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे घुसखोरी होत राहिली,
त्याचा फटका तेथील लोकांना बसला आहे, पण आता (Chowkidar)
चौकीदारच घुसखोरीपासून तुमचे संरक्षण करील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचार सभेत केले.
काँग्रेसने आसामचा वेळोवेळी विश्वासघात कसा केला हे सांगतील.
देशाच्या हिताविरोधात काम करणाऱ्यांना आसामची जनता पाठिंबा देणार का,
असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने कधीच देशाच्या व आसामच्या विकासाचा विचार केला नाही.
काँग्रेसने लोकांना फसवले पण चौकीदार लोकांचे घुसखोरीपासून रक्षण करील.
जनसंघ व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ास पाठिंबा दिला होता.
त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.सरकारच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, की चौकीदारानेच पीएम श्रमयोगी मानधन योजना सुरू केली,
ती चहामळ्यात काम करणाऱ्या लोकांना लागू आहे. यातील लोकांना वयाच्या साठीनंतर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत.