Homeताज्या घडामोडीअनेक तास मृतदेह रस्त्यावर पडून ,कोरोनाच्या भीतीनं कोणी हातही लावेणा..

अनेक तास मृतदेह रस्त्यावर पडून ,कोरोनाच्या भीतीनं कोणी हातही लावेणा..

Dead body lay on the road : अनेक तास मृतदेह रस्त्यावर पडून ,कोरोनाच्या भीतीनं कोणी हातही लावेणा..

more hours the dead body lay on the road, and no one had to help for fear of Corona.
संग्रहित फोटो

Dead body lay on the road : सजग नागरिक टाईम्स : पुणे शहरातील महर्षी नगर पोलीस चौकी शेजारील फुटपाथवर काल

एका तरुणाचा मृतदेह गेल्या अनेक तासापासून पडून असल्याने त्या परिसरात खळबळ माजली होती.

या मृत तरुणाला कोरोना असण्याच्या संशयाने मृत्यूदेह उचलण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले .

खूप वेळानंतर ॲम्बुलन्स तर आली मात्र ॲम्बुलन्स वाल्याने घाबरून त्या मृतदेहाला घेऊन जाण्यास नकार दिला व तेथून निघून गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

कोरोनापासून मयत झालेल्यांचे अंत्यविधी करताहेत सामाजिक संघटना

स्वारगेट पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना आणि वैद्यकीय यंत्रणेला कळविल्यानंतर त्याचा मृतदेह फुटपाथवरून हलवून ससून रुग्णालयात नेण्यात आला.

मृतदेह ससून रुग्णालयात नेण्या अगोदर पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात हमरीतुमरी झाल्याचेही काही स्थानिकांनी सांगितले.

मूलनिवासी मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार ,जमीर मोमीन ,अकबर मणियार यांनी पुढाकार घेऊन

त्या मृतदेहावर काल दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी मुस्लिम रितीरिवाजा प्रमाणे दफनविधी केला असल्याचे अकबर मणियार यांनी सजग नागरिक टाइम्स ला सांगितले.

तसेच त्या मृतदेहासोबत दिवसभर जो प्रकार घडला तो निंदनीय असल्याचे ही अकबर मणियार यांनी सांगितले आहे.

VIDEO : Hadapsar | Lockdown च्या काळात Smile Foundation तर्फे गरजुंना रेशनकिट ची मदत |

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular