(Food grain)आज १० तारीख उलटत आली तरी ई पॉस मशिन अपडेट झाले नसल्याने नागरिक धान्यापासून वंचित आहे.
(Food grain) सजग नागरिक टाईम्स :
पुणे शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडील ई पॉस मशिन या महिन्यात अपडेट न झाल्याने स्वस्त धान्य दुकानदार व नागरिकांची पंचायत झाली आहे.
दर महिन्याला नागरिकांना वेळेवर धान्य वितरण केले जात होते.
परंतु ई पॉस मशिन सॉफ्टवेअर संदर्भातील काही अपडेट अद्यावत न झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
१० तारीख उलटत असून हि पुण्यातील नागरिकांना अद्यापही रेशनिंगचे धान्य वितरण झालेले नाही .
ऑनलाईन सप्लाय चेन मॅनेजमेंट साईटवर डिओ जनरेट होऊन एसफीएफ पेमेंट झाल्यावर ट्रक चलन होऊन ई पॉस मशिनवर स्टॉक आल्याचे दाखवले जाते.
परंतु पुण्यातील काही परिमंडळ विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या ई पॉस मशिनवर अपडेट न आल्याने धान्य वितरण करताना अडचणी येत आहेत.
वाचा : पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाने रेशनिंग दुकानदारांकडून कोट्यावधी रुपयांची केली वसुली,
तर सध्या ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरित करण्याचे वरिष्ठांचे आदेशच नसल्याने नागरिकांना धान्य वितरण करण्यासाठी दुकानदारांना अडचणी येऊ लागल्या आहेत.
तर या संदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर एका दुकानदाराने सांगितले की आम्हाला ऑनलाईन पद्धतीने धान्य वाटप संदर्भात आदेश आलेले नाहीत.
तसेच ते आदेश आले तरी आम्हाला ते वाटप करताना अडचणी येणार आहे व आम्हाला मिळणाऱ्या कमिशनवर गदा येऊ शकते.
तरी अधिकाऱ्यांनी वरच्या स्तरावर निर्णय घ्यावा.
तर अधिक माहितीसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
वाचा : पुणे आरटीओची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,