Homeताज्या घडामोडीपुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाने रेशनिंग दुकानदारांकडून कोट्यावधी रुपयांची केली वसुली,

पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाने रेशनिंग दुकानदारांकडून कोट्यावधी रुपयांची केली वसुली,

(Recovered crores rupees) ३२ जणांची अनामत रक्कम जप्त तर २२ जणांचे परवाने रद्द.

फक्त “अ” आणि “क” परिमंडळ कार्यालयानेच दाखल केले आहे गुन्हे.

(Recovered crores rupees) सजग नागरिक टाईम्स : अजहर खान:

पुणे शहरातील ११ परिमंडळ विभागातील काही रेशनिंग दुकानदारांकडून कोट्यावधी रुपयांची वसुली केल्याची माहिती उजेडात आली आहे.

रेशनिंग दुकानदार करत असलेल्या धान्याची चोरी, ग्राहकांना पावती न देणे,

व इतर कारणांमुळे दुकाने तपासणी झाल्यानंतर ब-याच रेशनिंग दुकानादारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तर काही दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहे ,

व काहींचे निलंबित करण्यात आल्याचे पुणे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने दिलेल्या माहितून समोर आले आहे.

वाचा : बोगस आयकार्ड प्रकरणी नगरसेवकाच्या संस्थेला पुणे मनपाने मागितला खुलासा,

Foodgrains distribution office in Pune recovered crores rupees from ration shopkeepers

सन २०१८ मध्ये ३८ रेशनिंग दुकाने तपासणीत गहू व तांदूळ मध्ये तफावत आढळल्याने ५५४०२८२ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

तर २५ जणांची अनामत रक्कम जप्त करून १२ परवाने रद्द करण्यात आले आहे.

व २०१९ साली ९ दुकानदारांकडून १०१२२६८ आणि सन २०२० साली ३२७६२१ रुपयांची वसुली करण्यात आल्याने रेशनिंग दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु फक्त अनामत रक्कम जप्त करुन चालणार आहे का?

दोन-दोन वेळा अनामत रक्कम जप्त करूनही दुकानदारांना अद्दल घडलेली नाही.

आजही गोरगरिबांच्या धान्याची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे.

यावर परिमंडळ अधिका-यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

सन २०१८ मध्ये २५ जणांची अनामत रक्कम जप्त करून १२ परवाने रद्द करण्यात आले आहे. तर २०१९ मध्ये ३ जणांची अनामत रक्कम जप्त करून ४ परवाने रद्द करण्यात आले आहे.आणि २०२० साली ४ जणांची अनामत रक्कम जप्त करून ६ परवाने रद्द केलेले आहे. २०२० मध्ये ५ रेशनिंग दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

वाचा : भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण करणारे पोलीस उपनिरिक्षकासह पाच जण तडकाफडकी निलंबित

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular