ताज्या घडामोडीपुणे

आंबिल ओढय़ात ठेकेदाराच्या चुकीमुळे घरांना गेले तडे;

Advertisement

(AMBIL ODHA NEWS) महापालिकेची रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटिस

(AMBIL ODHA NEWS) आंबिल ओढय़ाच्या साफसफाईची कामे संथ गतीने सुरू असल्यामुळे पावसाळ्यात पुराच्या धोक्यामुळे या परिसरातील नागरिकांची जीव टांगणीला लागला आहे,

प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसला आहे.

आंबिल ओढय़ाची साफसफाई आणि ओढय़ालगत सीमाभिंतीचे काम करताना ठेकेदाराच्या चुकीमुळे इंदिरा गांधी वसाहत परिसरातील घरांना तडे गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

AMBIL ODHA NEWS

याबाबत स्थानिक रहिवाशांकडून तक्रार नोंदविण्यात आली,

तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी महापालिकेने रहिवाशांची घरे धोकादयक ठरवून त्यांना घरे रीकामे करण्याची नोटिस बजाविली असल्याची माहिती मिळाली .

Advertisement

वाचा : रेशनिंग दुकानात धान्य येऊनही नागरिकांना मारावे लागत आहे हेलपाटे.!

पावसाळ्याच्या तोंडावर आंबिल ओढय़ाच्या साफसफाईची कामे वेगात सुरू झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे,

तरी आंबिल ओढय़ातील कामे अर्धवटच करण्यात आल्याचे वास्तव पुढे आले आहे.

आंबिल ओढय़ातील राडारोडा पात्रात तसाच ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे आंबिल ओढय़ालगतच्या वसाहती आणि सोसायटय़ांना धोका निर्माण झाला असल्याची माहिती मिळाली.

वाचा: आज ही अपनी न्यूज वेबसाइट बनावाए और पैसे कमाएं.

Share Now