(Mla mahesh landage) आमदार महेश लांडगेंचे नाचतानाचे व्हिडीओ वायरल
(Mla mahesh landage) भोसरी : भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचा 6 जून रोजी विवाह सोहळा असून,
त्यापूर्वी रविवारी (दि.30) झालेल्या मांडव सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळून नृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आमदार महेश लांडगे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यासह इतर 60 जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.
वाचा : भाजप आमदार महेश लांडगेंचे बेफाम नृत्य
आमदार महेश किसनराव लांडगे, सचिन किसनराव लांडगे, राहुल लांडगे, अजित सस्ते,
गोपी कृष्ण धावडे, कुंदन गायकवाड, दत्ता गव्हाणे, सुनिल लांडे, प्रज्योत फुगे,
नितीन गोडसे, (सर्व रा. भोसरी) यांच्यासह 40 ते 50 अनोळखी लोकांवर भोसरी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे अंमलदार सुरेश नानासो वाघमोडे (वय-32) यांनी फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी हिचा विवाह 6 जून रोजी होणार आहे.
विवाह सोहळ्यापूर्वी रविवारी मांडव डहाळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांनी महेशदादा स्पोर्ट फाउंडेशन भोसरी गावठाण येथे सायंकाळी साडे सहा वाजता केले होते.
या कार्यक्रमात आमदार लांडगे, अजित सस्ते यांच्यासह इतर 40 ते 50 लोक परवानगी नसताने एकत्र जमले.
तसेच विनामास्क व सोशल डीस्नटेन्स न ठेवता कार्यक्रमात नृत्य केले.
आमदार महेश लांडगे यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले.
तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करुन स्वत:च्या व इतरांच्या जीवीताला धोका निर्माण केला.
भोसरी पोलिसांनी आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.