justice for Tabrez Ansari:तबरेज अंसारीला न्याय मिळावा म्हणून पुण्यात बोंबमारो आंदोलन
justice for Tabrez Ansari: मुस्लीमांवर होत असलेल्या माॅबलिंचीग बाबतीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन,
सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी अजहर खान: भारतात काहि राज्यात एकटे गाठून मुस्लीमांवर दिवसेंदिवस अत्याचार व मारहा णीचे प्रकार जास्त प्रमाणावर वाढत आहे,
त्यावर केंद्र सरकार चुपी सांधून आहे त्या चुपीचाच फायदा काहि जातीयवादी समाज कंटकाकडून घेतला जात आहे .
भारतातील पहिली घटना पुणे शहरात सन 2013 मध्ये घडली त्यात मोहसिन शेख याची हत्या जातीयवाद्यांकडून करण्यात आली.
त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी पहेलू खान,रोहित येमूला,
व अश्या अनेक जणांचे माॅबलिंचिगद्वारे जीव गेले आहे ,तसेच आजही ते जीव घेण्याचे प्रकार सुरूच आहे .
गेल्या काही दिवसापूर्वी झारखंडमध्ये जातीयवादी समाज कंटकाकडून भर रस्त्यात तबरेज अंसारी या युवाकाचे गर्दी जमवून व जय श्रीराम म्हणत अमानुषपणे मारहाण चालू होती ,
शेवटी मारहाण असहाय झाल्याने रूग्णालयात उपाचार सुरू असताना तबरेज अंसारी यास प्राण गमवावे लागले ,
माॅबलिंचिग चे प्रकार जास्तच वाढत असल्याने मुस्लीम समाजामध्ये रोष वाढत आहे,
याची मोदी सरकारने तातडीने दखल घ्यावी म्हणून आज दि 28 जून 2019 रोजी महाराष्ट्रातही विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली ,
व त्या त्याजिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले,
आज पुणे शहरातपण मोठ्या प्रमाणात बोंब मारो आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनात दलित ,मुस्लीम समाजातर्फे मोठ्या प्रमाणात नागरिक ,
संघटना रस्त्यावर उतरूले व तातडीने याची दखल घेण्याची मागणी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.