ताज्या घडामोडी

स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ)ने नागरिकाला दंडाची रक्कम खाजगी बँक खात्यात भरण्यास भाग पाडले.!

Advertisement

(special police officer) पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल.

(special police officer) सजग नागरिक टाईम्स पुणे ;

कोरानामुळे पुणे शहरातील पोलीसांनी एस.पी.ओ (स्पेशल पोलीस ऑफिसर) व पोलीस मित्रांची मदतीसाठी नेमणूक केली आहे.

एसपीओ व पोलीस मित्रांनी त्याचा गैरफायदा घेत उछांद मांडला आहे.

त्यांना अधिकार नसतानाही ते पोलीसांसारखे अधिकार वापरताना दिसत आहे.

तर या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या आहे.

तर याबाबतीत सोशल मिडियावर सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू आहे.

पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली असली तरी अद्यापही स्पेशल पोलीस ऑफिसर(spo) म्हणून मिरवणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.

त्यामुळे पुणेकरांची लूट होत आहे.

असाच एक लूटचा प्रकार खडक पोलीस ठाण्याजवळील फडगेट पोलीस चौकी जवळ घडल्याने थेट पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांकडे पुराव्यासहित लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वाचा : भाजप आमदार महेश लांडगेंचे बेफाम नृत्य

रहिम अहमद खान यांनी केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि फडगेट पोलीस चौकी जवळ ८ मे रोजी नाकाबंदी सुरू होती.

special-police-officer-forced-the-payment-of-the-fine-into-a-private-bank-account

फडगेट पोलीस चौकीच्या समोरील रस्त्यावर बॅरेकेट लावून उभे असलेले एस.पी.ओ.

व सिव्हील ड्रेसमध्ये टी शर्ट व जीन्स घातलेले पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी नाकाबंदी करीत होते,

नाकाबंदी करत असताना रहिम अहमद खान यांना रस्त्यावरून जाताना त्यांना अडविण्यात आले.

रहिम खान हे ई-कॉमर्स इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये इंटरनेट ब्रॉडबॅड व केबल ऑपरेटर म्हणुन काम करतात.

रहिम खान तेथून जाताना त्यांना थांबवून एसपीओकडून विचारणा करण्यात आली.

त्यावर रहिम खान यांनी विचारले की, तुम्ही विचारणारे कोण ?

त्यामुळे एसपीओने खान यांची गछंडी धरत म्हणाले कि तुम्ही
विनाकारण फिरत आहात म्हणुन ५०० ची पावती फाडा.

पावती फाडताना रहिम खान यांनी विचारले मी पावती फाडायला तयार आहे पण तुम्ही कोण आहे ते सांगा,

असे विचारल्यावर ते म्हणाले की, मी पोलीस आहे.

त्यावर रहिम खान म्हणाले जीन्स व टी शर्ट घालून तुम्ही ड्यूटी करताय का ?

येथे सर्व सिव्हीलमध्ये उभे आहेत तुमचे ओळखपत्र मला दाखवा.

Advertisement

त्यामुळे त्यांना राग आला व त्यावर ते पोलीस व एस.पी.ओ. म्हणाले की,

आम्ही फडगेट पोलीस चौकी समोर उभे राहून बॅरेकेट लावून तुम्हाला अडवतो तर आम्ही काय दरोडेखोर आहे का?

त्यावर’ खान म्हणाले की, तुम्ही सिव्हील ड्रेसमध्ये आहात म्हणुन मी विचारले.

त्यावर पोलीसांनी सांगितले की, तुम्हांला पावती करावी लागेल.

त्यावर रहिम खान यांनी सांगितले मी इमर्जन्सी सर्विसमध्ये ई-कॉमर्स म्हणुन आहे ,

मला परवानगी आहे त्याचा माझेकडे जी आर आहे त्यावर ते म्हणाले की,

“अशी कोणतीही परवानगी नाही असले आम्ही काय बघत नाही,

तुम्ही रू.५००/- ची पावती फाडा. खान यांना उशीर होत असल्याने ते पावती फाडण्यासाठी तयार झाले

त्यांना फडगेट पोलीस चौकीसमोरील गुरुदत्त मेडिकल या ठिकाणी पाठविले व खान यांनी पोलीसांनी सांगितल्यामुळे मेडिकलच्या अनिरूध्द किरण या नावाने असलेल्या क्युआर कोडवर ५००/- ऑनलाईन पेमेंट केले आहे.

payment bill

परंतु मेडिकलच्या क्युआर मध्ये पैसा का जमा करायला लावले ?

पोलिसांकडे ई पॉस मशिन व पावती पुस्तक असताना मेडिकल धारकाकडे ५०० रूपये जमा करायची आवश्यकता का भासली ?

दिवसाभरात अथवा महिन्याभरात असे किती पैसे मेडिकल मध्ये जमा झालेत ?

यात वाटणी कोणाकोणाची ? विशेष म्हणजे एसपीओ हे फुकटात काम करत असेल तर यांचे घर कसे चालते ?

मेडीकल धारकाच्या खात्यात जमा होणारी रक्कम बाबतीत वरिष्ठांना माहित आहे का ?

असे अनेक प्रश्न रहिम खान यांना आले व त्यांनी पोलिसात तक्रार केली.

याची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध निलंबनाची कारवाई होणार का ? मेडिकल धारकाची चौकशी होणार का ? असे अनेक प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केले जात आहे.

एक एसपीओ सगळीकडे का दिसत आहे ?

फडगेट पोलीस चौकी जवळ रहिम खान यांना धरणारा एसपीओ शोएब बागवान हा फडगेट पोलीस चौकी,

फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेश पेठ पोलीस चौकी , सहकारनगर पोलीस स्टेशन,

समर्थ पोलीस स्टेशन, नाना पेठ पोलीस चौकी या ठिकाणी सर्रासपणे दिसत असल्याचे रहिम खान यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वाचा : आज ही अपनी न्यूज वेबसाइट बनावाए और पैसा कमाएं

Share Now