(Deepak Maratkar murder case) युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर यांचा 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री खून करण्यात आला होता,
सदरील खून हे कुख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
(Deepak Maratkar murder case) सजग नागरिक टाइम्स :
पुण्यात गाजलेल्या युवा सेनेचा पदाधिकारी दिपक मारटकर यांचा खून कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून केल्याचे निष्पन्न झाले,
निष्पन्न झाल्यानंतर आता याच प्रकरणात पुणे पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
या पोलिसांचे बुधवारी निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. नायर ला ससून हॉस्पिटल मध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले होते.
पोलीस बंदोबस्त असतानाही आरोपी त्याला भेटले कसे , असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी चालू होती.
याकाळात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता.
त्याची दखल घेत या 6 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
वाचा : पुण्यातील वाहतूक पोलिसांकडील पिळवणूक थांबणार,
याप्रकरणात कोर्ट कंपनीमधील पोलीस हवालदार सुभाष ननावरे, सूर्यकांत मानकुमरे,कर्मचारी सुधीर कुठवड,
रोहित ओव्हळ, संजय चव्हाण ,भीमाशंकर ठाणेदार यांना निलंबित करण्यात आले आहे.सुभाष ननावरे हे पोलीस हवालदार असून,
लोहमार्ग पोलीस दलातून ते पुण्यात बदलून आले आहेत.तर इतर पोलीस कर्मचारी 2016 बॅचचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेनेचा पदाधिकारी दीपक मारटकर यांचा 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 10 जणांनी कोयत्याने सपासप वारकरून निर्घृण खून केला होता.
अधिक वाचा : पुणे शहरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून,
काही दिवसांत पुणे पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांना अटक केली.
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून झाल्याचे समोर आले आहे.
या खुनातील आरोपी हे बापू नायर याला ससून रुग्णालयात भेटल्याचे समोर आले होते. बापू नायर सध्या कारागृहात आहे.
उपचारासाठी तो ससून रुग्णालयात आला होता त्यावेळी या आरोपींनी त्याची भेट घेतली होती,
त्यानंतर या खुनाचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे .