ताज्या घडामोडी

दलित पँथरच्यावतीने पदमश्री Namdeo dhasal पुरस्कार वितरण

Advertisement

Padmashree namdeo dhasal Puraskar: दलित पँथरच्यावतीने ४६ वा वर्धापनदिनानिमित्त मेळावा उत्साह:उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना पँथर पदमश्री नामदेव ढसाळ पुरस्कार वितरण.दलित पँथरच्यावतीने ४६ वा वर्धापनदिनानिमित्त ” भव्य मेळावा ” उत्साहात संपन्न झाला .

Dalit Panther Padmashree namdeo dhasal Award Distribution

पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये  दलित पँथरच्यावतीने ४६ वा वर्धापनदिनानिमित्त ” भव्य मेळाव्याचे ” आयोजन करण्यात आले होते .

या मेळाव्याचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

हिंदी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे स्वागतअध्यक्ष दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम 

नगरसेविका लता राजगुरू ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे शहराध्यक्ष अशोक कांबळे माजी नगरसेवक दत्ता बहिरट ,

दादासाहेब सोनवणे ,महाराष्ट्र वन संवर्धन प्रमुख जीत सिंगनिलेश आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते .

Advertisement

हे पण वाचा:  तारक मेहता मधील डॉ हाथी यांचे निधन

या मेळाव्यामध्ये पँथर पदमश्री नामदेव ढसाळ पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले .  

यामध्ये वाडिया महाविद्यालयासमोर देशात सर्वप्रथम माता रमाईचा पूर्णाकृती पुतळा उभारणारे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे समन्व्यक विठ्ठल गायकवाड

वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे होप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अमोल देवळेकर

पुणे मुंबई सायकल स्पर्धा दरवर्षी आयोजित करणारे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे प्रताप जाधव आदींना संविधानाची प्रत ,सन्मानचिन्ह शाल देउन सन्मानित करण्यात आले.

हे पण वाचा:पालखीतील वारकरी बांधवां सोबत  ईद मिलन कार्यक्रम संपन्न.मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट

या पदमश्री Namdeo dhasal पुरस्कार मेळाव्याचे आयोजन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम ,कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद ,पुणे शहर अध्यक्ष गणेश नायडू 

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश काकडे ,अल्पसंख्यांक विभाग पुणे शहर अध्यक्ष इलियास शेख यांनी केले होते . 

 या मेळाव्यात  स्वागतअध्यक्ष दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांनी सर्वांचे स्वागत केले तर मेळाव्याचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार विठ्ठल गायकवाड यांनी मानले .

 

Share Now

One thought on “दलित पँथरच्यावतीने पदमश्री Namdeo dhasal पुरस्कार वितरण

Leave a Reply