पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात
सजग नागरिक टाइम्स :पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी चुकीचे अपंग प्रमाणपत्र सादर करुन स्वतःची अधिष्ठता या पदावर नेमणूक करुन शासनाची तसेच दिव्यांगाची फसवणूक केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी केला होता.
