ताज्या घडामोडी

कामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.

Advertisement

(bhavani peth word office) बिल अगोदर काम नंतर का ?

(bhavani peth word office) निकृष्ट दर्जाचे कामे होत असताना वरिष्ठांचे मात्र सोईस्कर दुर्लक्ष?

भाग १

सजग नागरिक टाईम्स : अजहर खान : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर वारंवार येत असूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

तर विकासकांची मुदत २५ मार्च पर्यंत पुणे महानगर पालिका आयुक्तांनी आखून दिलेली असताना डेडलाईन उलटून गेल्यानंतरही विकास कामे होत असल्याचे सजग नागरिक टाईम्सच्या निर्दशनास काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणून दिले आहे.

bhavani-peth-word-office-bills-submitted-but-work--still-going-on-order
डेडलाइन 25मार्च काम शुरु 7एप्रिल का? 👆

आणि विषेश म्हणजे २५ मार्च नंतर कामे करताना पुणे महानगर पालिका आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असताना सर्व नियम धाब्यावर बसवत कामे करत असल्याचे दिसून येत आहे.

१) गाडीखाना मागील रस्ता बोंबील मार्केट, २) सुभेदार तालीम चौक ते पंचमुखी मारुती मंदिर ते पानघंटी चौक ( शितलादेवी चौक ),

३) बंदीवान मारुती मंदिर ते फुलवाला चौक, ४) कस्तुरी चौक ते बॅंक ऑफ महाराष्ट्र पर्यंत, ५) खडकमाळ आळी चर्च ते अशोक बेकरी पुढील चौक,

६) ७ नंबर पीएमसी कॉलनी ते कर्मशाळा पर्यंत अशा ठिकाणी रातोरात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे.

या संदर्भात कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

परंतु वर्क ऑर्डर, थर्ड पार्टी रिपोर्ट, डांबरीकरण टेस्ट रिपोर्ट मागितली असता वेळ मारून नेली आहे.

रमेश पाटोळे यांना डांबरीकरणाचे व फुटपाथाचे काम करण्यासाठी आयुक्तांनी मुदत वाढ दिली आहे का ?

अधिक विचारणा केली असता त्यांची बोबडी वळली.

Advertisement

व पाटोळे यांच्या बोलण्यावरून संशय आल्याने झोन ५ चे उपायुक्त सपकाळ यांना संपर्क साधून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १८ मधील सुरू असलेल्या कामासंदर्भात वित्तिय कमिटीची मान्यता घेतली आहे का?

व आयुक्तांनी सदरील डांबरीकरणाच्या व फुटपाथाच्या कामाला परवानगी दिली आहे का ?

अशी विचारणा केली असता अशी कोणतीही परवानगी नसल्याचे सपकाळ यांनी सजग प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले आहे.

मग परवानगीच नसेल तर कोणाच्या आशिर्वादाने व छत्रछायेखाली काम सुरू आहे? सदरील डांबरीकरण करणारा ठेकेदार कोण?

पहिले बिले पास नंतर कामे तर होत नाही ना? ठेकेदाराचे नाव कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे हे का लपवत आहे?

त्यांचे व ठेकेदाराचे साटेलोटे तर नाही ना ? थर्ड पार्टी रिपोर्ट का दाखवले जात नाही ? भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी सचिन तामखेडे यांच्या कसे काय निर्दशनास सदरील प्रकार आला नाही?

असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.

सदरील कामांची स्वता पुणे महानगर पालिका आयुक्तांनी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला काळ्यायादीत टाकून

कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

या प्रकरणात आयुक्त विक्रम कुमार व उपायुक्त सपकाळ काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

डांबरीकरण केल्याने चंद्रावर आल्या सारखे दृश्य?

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला ऐवढी कशाची घाई झाली होती की रातोरात डांबरीकरण करून मोकळे झाले आहे.डांबरीकरण करताना सगळे निकष धाब्यावर बसवून कामे केल्याचे दिसून येत आहे. तर पहिल्याच पावसात सदरील रस्त्यावर खड्डे पडणार यात शंकाच नाही ? आणि विषेश म्हणजे डांबरीकरण करताना भररस्त्यातील ड्रेनजची झाकणे खाली गेल्याने व झाकणांची लेवल न केल्याने सदरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे दिसत असल्याने चंद्रावर आल्या सारखे दृश्य दिसत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे दिसले नाही व‌ अपघात झाल्यास याला उपायुक्त सपकाळ, क्षेत्रीय अधिकारी तामखेडे किंवा कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे यापैकी कोण जबाबदार असणार?

Share Now

One thought on “कामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.

Comments are closed.