ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलीसांनी केले जेरबंद

Advertisement

(Kondhwa police arrested ) सजग नागरिक टाइम्स: पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याने सर्व पोलीस कामाला लागले असून कोंढवा पोलिसांचे काम वेगाने चालू आहे ,

3 दिवसापूर्वीच कोंढवा पोलिसांनी दीड वर्षापासून मोक्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस बाहेर गावावरून पकडून आणले होते.

आत्ता बोपदेव घाटामध्ये गावठी कट्टा घेवून संशयीतरित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलीसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० फेब्रुवारी रोजी तपास पथकाचे पोउपनिरीक्षक स्वप्नील पाटील , पोहवा निलेश देसाई , पोहवा सतिश चव्हाण , पोना गोरखनाथ चिनके , पोना जोतिबा पवार , पो.अं. संतोष बनसुडे , पो.अं. सागर भोसले ,

पो.अं. सुजित मदन व पो.अं. लक्ष्मण होळकर असे कोंढवा पोस्टे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या तसेच अवैध धंद्यांचे अनुषंगाने कोंढवा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना रात्रौ 10 च्या सुमारास बोपदेव घाटात तीन इसम त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बजाज डिस्कव्हर दुचाकी मोटर सायकल क्र . एम.एच .०३ ए.पी. ४८८० याच्यावरून तोंडाला रूमाल बांधुन बोपदेव घाटाचे टेबल टॉप पॉइंटच्या दिशेने जात असताना दिसून आल्याने पोलीस स्टाफने त्यांना गाडी थांबविण्याकरीता सांगितली .

त्यावेळी सदर इसमांनी त्यांची मोटार सायकल जोरात टेबल टॉप पॉइंटच्या दिशेने पळविली .

पोलीसांनी बोपदेव घाटाचे टेबल टॉप पॉइंटचे उजव्या बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत त्यांना थांबवून सदर तीनही इसमांना पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी त्यांच्या तोडावर लागलेले रूमाल काढून त्यांना नाव व पत्ता विचारले असता दुचाकी गाडी चालविणाऱ्या इसमाने त्याचे नाव १ ) सोनुकुमार छोटेलाल सरोज , (वय २३ वर्षे , धंदा मजुरी , रा . पुणे रेल्वे स्टेशन जवळील वजन काट्या शेजारील खोलीमध्ये , पुणे) ( मुळ रा . मु.पो. बुढेपुर , ता . कुंडा , थाणा बाघराय , जि . प्रतापगढ , उत्तर प्रदेश ) ,

Advertisement

मध्ये बसलेल्या इसमाने त्याचे नाव २ ) राजा शिवपुजन सरोज , वय २० वर्षे , धंदा मजुरी , रा . मु . लोचनगढ , पो . डरवा , ता . कुंडा , थाणा मेहेजगंज , जि . प्रतापगढ , उत्तर प्रदेश व दुचाकी गाडीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव ३ ) मिथीलेश कुल्लन सरोज , वय २० वर्षे , धंदा मजुरी , रा . पुणे रेल्वे स्टेशन जवळील वजन काट्या शेजारील खोलीमध्ये , पुणे ( मुळ रा . मु.पो. बुढेपुर , ता . कुंडा , थाणा बाघराय , जि . प्रतापगढ , उत्तर प्रदेश ) असे असल्याचे सांगितले .

सदरील आरोपींकडे २०,००० / – रू कि चा एक गावठी बनावटीचा कट्टा मिळून आल्याने त्यांचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६४/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) . महारष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे .

वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त रितेश कुमार , राह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग , रंजन कुमार शर्मा , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -५ विक्रांत देशमुख , सहा . पोलीस आयुक्त वानवडी विभाग पौर्णिमा तावरे ,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे , पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील , पोहवा निलेश देसाई , पोहवा सतिश चव्हाण , पोना गोरखनाथ चिनके ,

पोलीस नाईक जोतिबा पवार , पोअं . सुजित मदन , पोअं बनसुडे , पोअ . ज्ञानेश्वर भोसले , पो.अं. सुरज शुक्ला व पोअं लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे .

Share Now