ताज्या घडामोडीपुणे

पुणे वाहतुक पोलिसां कडून रिक्षा चालकांची पिळवणूक

Advertisement

पुणे Traffice police कडून रिक्षा चालकांची पिळवणूक

PUNE TRAFFICE POLICE LOGO

आरटीओ म्हणते रिक्षा शिपने देता येते

सनाटा प्रतिनिधी:Traffice police News: अजहर खान :पुणे शहराची मेट्रोचे शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत आहे,

त्यामुळे काहि गावातील बेरोजगार नागरिकांचा कल रोजंदारीसाठी पुण्याकडे वाढत आहे,

त्यात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने  (RTO) बेरोजगारांना स्वताचा रोजगार करता यावा ,

यासाठी रिक्षा परमीट परवाना मोठ्या प्रमाणावर सोडले आहे त्याचा फायदा अनेक गरजूंना देखील झाला आहे.

परंतु वाहतुक पोलिसांच्या मनमानी कारभार,आर्थिक लूट प्रकरणी रिक्षा चालक अक्षरशः वैतागले आहेत.

पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून सध्या कारवाई सुरू आहेत लायसेन्स, पीयूसी, कागदपत्रे, नंबर प्लेट, 

लाईट नसल्याचे सांगून अश्या अनेक विषय काढून रिक्षा चालकांची पिळवणूक करून एका प्रकारे बलीचा बकराच बनविला जात आहे.

Sixsense film production च्या वितरकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

परंतु तर आता नविन जावई शोध लावून पुणे शहर वाहतुक पोलीसांनी अकलेचे तारेच तोडले आहेत,

रिक्षा शीपने देता येत नाही व ज्याच्या नावाने आरटीओ ने परमीट दिले आहे त्या व्यकतीनेच सदरील रिक्षा चालवावी असे म्हणत शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केल्या आहेत,

त्यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून तेरी भी चुप मेरी भी चूप असे प्रकार घडत आहे.

Advertisement
whatsapp join sajag nagrikk times

असाच प्रकार पुण्यातील समाजिक कार्यकर्ते वाजिद एस खान यांनी उघडकीस आणला,

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला लेखी तक्रार करून वाहतुक पोलिस अश्या प्रकारच्या कारवाई करू शकतात का याचा देखील खुलासा मागितला होता

त्या पत्राचा खुलासा करताना पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लेखी पत्राद्वारे कळविले आहे कि रिक्षा परवानाधारक रिक्षा चालविण्यासाठी चालक नियुक्त करू शकतो,

आता या पत्राची दखल घेत पुणे शहर वाहतुक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांची काय भुमिका असणार यावर रिक्षा चालकांचे लक्ष लागून राहणार आहे.

वाहतुक पोलिसांना अधिकार नसताना हि नको त्या ठिकाणी ढवळाढवळ करतात

आणि चिरीमिरीसाठी काहिही मनमानी नियम लावून आर्थिक पिळवणूक करतात,

वाहतुक पोलिस उपायुक्त यांचे कनिष्ठांवर नियंत्रण नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत,

 वाजिद एस खान, समाजिक कार्यकर्ते

हेपण पहा :

Sanata news च्या video बातम्या पहाण्यासाठी  क्लिक करा 

सनाटा के हिंदी समाचार पढने के लिए  क्लिक करे।

Birthday :आपल्या प्रियजनांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा  

आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा  

5-people-injury-tree-collapsed-pune-saras-baug/
Share Now

2 thoughts on “पुणे वाहतुक पोलिसां कडून रिक्षा चालकांची पिळवणूक

Leave a Reply