Homeताज्या घडामोडीउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच !

उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच !

(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत ?

(Bhavani peth news 2021) सजग नागरिक टाईम्स : अजहर खान :

पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कामाबाबत बोंबाबोंब,

नागरिकांच्या अनेक तक्रारी सुरू असताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून जेथे गरज नाही तेथे रातोरात कामे धोपटली जात असल्याचे समोर आले आहे.

तर सदरील कामे रोखण्याचे वरिष्ठांचे आदेश असतानाही सदरील आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी करत आहे.

bhavani peth news 2021
प्रभाग क्रमांक १८ मधील भैरवसिंग घोरपडे उद्यानाच्या मागील फूटपाथ,

सदरील कामकाजा संदर्भात उपायुक्त अविनाश सपकाळ यांना संपर्क केला असता भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील सध्या सुरु असलेले काम थांबविण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु प्रभाग क्रमांक १८ मधील भैरवसिंग घोरपडे उद्यानाच्या मागील फूटपाथ,

सरदार सुभेदार तालीम चौक जैन मंदिराच्या फुटपाथचे काम चालू असल्याचे निदर्शनास आल्याने सदरील कामासंदर्भात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळे झाले.

bhavani-peth-news-2021
सरदार सुभेदार तालीम चौक जैन मंदिर फुटपाथ

तर उप-अभियंता असलेल्या एका अधिकाऱ्याला सदरील कामकाज संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आमच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया व्यतिरिक्त इतरही क्षेत्रीय कार्यालयात कामकाज सुरू असून तेथे ही लक्ष घालण्याचे त्या अधिकाऱ्याने सजग प्रतिनिधीना सांगितले.

परंतु त्या अधिकाऱ्याची गत अशी झाली आहे की स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून ?

उपायुक्त अविनाश सपकाळ यांचे आदेश धाब्यावर बसविण्याची गरज का भासली ?

ठेकेदाराची अधिकाऱ्यांसोबत पार्टनरशिप तर नाही ना ?

असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.

आता यावर उपायुक्त अविनाश सपकाळ कारवाई करणार का ?

की फक्त बघण्याची भूमिका घेणार ? याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

दोन्ही उप-अभियंत्याचे एकमेकांकडे बोट ?

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला दोन उप अभियंते असताना दोघांत ताळमेळ नसल्याचे दिसून येते. मग प्रभाग क्रमांक १८ कोणत्या उप अभियंताकडे आहे ? या संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. तर सदरील कामाचे बिल कोणी अदा केले हे गुलदस्त्यातच आहे. सगळे अधिकारी एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहे. या अधिकाऱ्यांची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular